भुसावळ शहरातील भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि माता रमाई भीमबा आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन
राहुल वसंतदादा तायडे,शहराध्यक्ष यांनी केले. सौ. संजिवनी राहुल तायडे,राजेश्री सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रेल्वे स्टेशन, भुसावळ येथे करण्यात आले.
समाजाच्या विविध घटकांचा कार्यक्रमात सहभाग
संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती, भुसावळ जय गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था आणि समस्त समाज बांधवांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा सरचिटणीस संतोष ठोकळ, गणेश जाधव, रविंद्र दाभाडे आणि उपाध्यक्ष प्रेमचंद (अल्बर्ट) तायडे, गौरव वाघ, वाल्मिक पवार, दिपक गायकवाड, राकेश सपकाळे, दिनेश बालूरे, आकाश आव्हाड, विक्की गोहर, दिपक सोनवणे, रविंद्रनाथ खरात, संजय चव्हाण, नरेश खंडारे, रविंद्र घुले, शंकर कांबळे, श्याम गोरधे, भरत उमरिया, संजय नरवाडे, राज आठवले, प्रकाश लोडते, शुभम गोठवाल, आणि विनोद लोडते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply