समाजहिताच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या भोरगाव लेवा पंचायत विभाग भुसावळतर्फे तरुणांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा भोरगाव लेवा पंचायत विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषचंद्र भंगाळे आणि धीरज पाटील यांनी केली.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सागर वाघोदे, सचिवपदी अमोल महाजन, सहसचिव शेखर धांडे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून पवन बाक्षे, सुमित बऱ्हाटे, सागर सरोदे, शिशिर जावळे, जीवन वारके आणि पवन भोळे यांची नियुक्ती झाली आहे. खजिनदारपदी प्रवीण पाटील, तर सहखजिनदार अश्विन लोखंडे यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अमोल पाटील, गौरव महाजन, ललित भोळे, यश फालक, वरद फालक, श्रेयस इंगळे, विकास पाटील, हर्षल बोरोले आणि निलेश भोळे यांचा समावेश आहे.
युवक मंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना दिशा देणारे उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असून, सदस्य नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply