भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ महिला मंडळाच्या वतीने लेवा पाटीदार समाजातील हौशी गायकांसाठी ‘करा ओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज रविवार, दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत प्रभाकर हॉल, भुसावळ येथे होणार आहे.करा ओके’ स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धक दिवस-रात्र तयारी करत आहेत. अनेकांनी पारंपरिक गाणी, तर काहींनी बॉलिवूड गाणी सादर करण्याचे ठरवले आहे.प्रत्येक वयोगटात स्पर्धा चुरशीची होणार असून प्रेक्षकांसाठी संगीतमय पर्वणी ठरणार आहे.लेवा पाटीदार समाजातील मुले, मुली, महिला व पुरुष या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. आयोजकांनी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
स्वरांच्या मैफलीस सज्ज भुसावळ- स्पर्धकांकडून जोरदार तयारी. भोरगाव लेवा पंचायत तर्फे आयोजन

Leave a Reply