भुसावळ शहरात आज सूर्यकन्या तापी माता जन्मोत्सव निमित्त आयोजित “तापी महाआरती व पूजन” कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
{स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने, कोणत्याही संस्थेचा, जातीचा, किंवा पक्षाचा झेंडा न लावता फक्त “संस्कृती हाच अजेंडा”} या भावनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध घटकांतील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक महाआरती केली.
तापी नदीच्या काठावर पार पडलेल्या या पूजनात महिलांचा व तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. शंखध्वनी, पारंपरिक पद्धतीने आरती सादर करण्यात आली. अनेक श्रद्धाळूंनी दिवे प्रज्वलित करून तापी माता पूजनात सहभाग नोंदविला.
या उपक्रमाचे सर्व समन्वयक श्री. मंगेश पि. भावे ,श्री.राहुल संगीता रमेश सोनटक्के, श्री. हरीश अनिल लोखंडे सौ. मंगला पाटील, सौ.प्रभावती पाटील, सौ.स्वाती भोळे, सौ.मेघा कुरकुरे, सौ.वैशाली चौधरी,सौ.विजया निकम यांनी सांगितले की, “तापी नदी केवळ पाण्याचा स्रोत नाही, ती आपली संस्कृती आहे. तिचा सन्मान आणि संवर्धन आपल्या कर्तव्याचा भाग आहे. तसेच सकल भुसावळ वासियांन तर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार असून तापी मातेची साप्ताहिक आरती करून नदी पात्र व परिसरातील साफ सफाईचे करण्याचा संकल्प आज सर्वांनी केला आहे.
” कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री निलेश लाखोटे, श्री सुधीर मायकल, दीपक तिवारी, यश इंगळे, साई गोसावी व असे अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे योगदान लाभले. उपस्थितांनी भविष्यातही अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सगळ्यांचा सहभाग असेल..!!










