Author: Amit Asodekar

  • भाजपा भुसावळच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त रूग्णालयात प्रतिमा पूजन आणि फळ वाटप

    भाजपा भुसावळच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त रूग्णालयात प्रतिमा पूजन आणि फळ वाटप

    भारतीय जनता पार्टी (भा.ज.पा.) भुसावळ शहराच्या वतीने राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज संत गाडगेबाबा महाराज रूग्णालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन करण्यात आले आणि रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमात भाजपा जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, रूग्णालयातील प्रमुख डॉ. फलटणकर मॅडम, डॉ. तौसीफसर, डॉ. संदीपसर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल वसंत तायडे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, राजू चंदन, गोपीसिंग राजपूत,आणि विविध डॉक्टर्स, नर्सेस तसेच रूग्णालय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

    या प्रसंगी, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी संत गाडगेबाबांच्या शिकवणीला पुढे नेत समाजातील गरजू लोकांसाठी आपल्या कर्तव्यातून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.

  • तळवेल गावातील पहिले नर्मदा परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांचा जाहीर सत्कार

    तळवेल गावातील पहिले नर्मदा परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांचा जाहीर सत्कार

    आपल्या गावातील नागरिकांनी केलेला हा सत्कार नक्कीच महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान केल्या समान आहे,किंबहुना कणकभर जास्त आहे कारण सत्कार माझ्या तळवेलवासीयांना केला आहे,त्यामुळे हा सोहळा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे,असे प्रतिपादन आज नर्मदा माता परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांनी केले.

    श्री म्हाळसादेवी मंदिर संस्थान तळवेलच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित श्री संगीतमय रामायण कथा व अखंड हरीनाम सकीर्तन सोहळा कार्यक्रमात तळवेल गावातील पहिले माता नर्मदा परीक्रमावासी ज्यांनी सलग १०८ दिवसात ३६०९ किलोमीटर अंतर पायी पायी चालत पूर्ण केला म्हणुन डॉ.नितु पाटील यांचा सपत्नीक सत्कार समारंभ संस्थान मार्फत आयोजित केला होता.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.मनोज बुवा सोबत त्यांचे सर्व भजनी मंडळ तसेच भुसावळ शेतकी अध्यक्ष ज्ञानदेव झोपे,अर्जुन इंगळे संस्थान अध्यक्ष प्रो.डॉ.निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील,सुधीर पाटील,विनोद पाटील,ओंकार भोगे,ललिता पाटील,रवि पाटील आदी उपस्थित होते.तसेच यावेळी डॉ.नितु पाटील यांचे वडील तुकाराम पाटील आणि आई वैशाली पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.

    पुढे डॉ.पाटील आपले नर्मदा परिक्रमा अनुभव सांगतांना म्हणाले कि परिक्रमा सुरु झाल्यावर तिसऱ्या दिवसी एका आश्रमात निवास करत असतांना एका महाराज यांनी मला एक प्रश्न विचारला.ते म्हणाले,” डॉ.साहेब मुझे खाना खाने के बाद भूक नही लगती और जब मै सोता हुं,तब मेरी आँखं खुली नही रहती ? तेव्हा मी लगेच म्हणालो,” महाराज मै आपको गोलिया लिख देता हुं,आपको बस एक गोली निंद लगने के बाद और दुसरी गोली निंद खुलने सें पहले लेनी हैं” यावर त्याठिकाणी एकच हशा पिकला.असे विविध अनुभव यावेळी कथन करण्यात आले.शेवटी डॉ.पाटील यांनी सर्व मंडळींना माता नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आवाहन केले सोबत त्यासाठी काही मार्गदर्शन हवे असल्यास मी सदैव आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी तुकाराम पाटील,वैशाली पाटील,डॉ.रेणुका पाटील,चि.वेदांत,चि.दुर्वांग,कपिल राणे,दीपक फेगडे,गोलू,मझर शेख,योगेश मगरे असा संपूर्ण वासुदेव परिवार उपस्थित होता.

  • भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

    भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

    भुसावळ — दि.19/02/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ आर पी फालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती प्रित्यर्थ जीवनकार्याचा आढावा घेतला
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्रा डॉ आर बी ढाके, प्रा आर डी भोळे, प्रा डॉ जगदीश चव्हाण प्रा. माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले प्रा डॉ जी पी वाघुळदे, डॉ अंजली पाटील, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा संगीता धर्माधिकारी , प्रा डॉ माधुरी पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री दीपक महाजन व विद्यार्थी उपस्थित होते.असे प्रसिद्धी प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले.

  • पुणे येथे शिवजयंती निमित्त “जय शिवाजी-जय भारत” पदयात्रेचे आयोजन

    पुणे येथे शिवजयंती निमित्त “जय शिवाजी-जय भारत” पदयात्रेचे आयोजन

    अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच 20000 माय भारत स्वयंसेवकांसह #पुणे येथे सीओईपी मैदान ते फर्ग्युसन महाविद्यालय “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा काढण्यात आली.
    या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विकसित भारताला कायम प्रेरणा देणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि चिरस्थायी वारशाचा गौरव केला गेला असून, युवावर्ग, स्थानिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणत, प्रथमच महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या पदयात्रा आयोजित केल्या गेल्या होत्या. निसर्गरम्य वातावरणातून 4 किलोमीटर अंतरांची वाटचाल करणाऱ्या या पदयात्रेचा आरंभ पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून होऊन, फर्ग्युसन महाविद्यालय येथे पदयात्रेची सांगता झाली.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सदर पदयात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यात ऐतिहासिक स्थळे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता राबविणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यासाठी योगासनांच्या सत्रांचे आयोजन, शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि नेतृत्वावर आधारित पाहुण्यांची व्याख्यानमाला आयोजन, शिवाजी महाराजांच्या वारशाला अधोरेखित करणाऱ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    संविधानाच्या 75 वर्षपूर्तीच्या सन्मानार्थ आणि भारताची चैतन्यमय सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी नियोजित 24 पदयात्रांच्या मालिकेतील पुण्यातील “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा, ही सहावी पदयात्रा आहे. देशभरात अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत वर्षभर आयोजित केले जाणार असून त्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवणे आणि भारताच्या समृद्ध वारशाशी अनुबंध जोडणे हा त्यामागील उद्देश आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तसेच अखंड आणि आत्मनिर्भर भारताबद्दलची त्यांची दूरदृष्टी, यांचा सन्मान करणेसाठी, भारतभरातील तरुणांनी माय भारत पोर्टलवर ( www.mybharat.gov.in ) नोंदणी करून या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन मंत्रालयाने केले होते त्याला चांगल प्रतिसाद मिळाला.

    यावेळी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील, माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.आशिषजी शेलार, क्रीडा, युवक आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री.दत्तात्रयजी भरणे, माजी केंद्रीय मंत्री श्री.प्रकाशजी जावडेकर, राज्यसभा खासदार श्रीमती मेधाजी कुलकर्णी, आमदार श्री.सिद्धार्थजी शिरोळे, आमदार श्री.हेमंतजी रासने ई. प्रमुख उपस्थितीत होते

  • महिलांच्या शक्तीचा उत्सव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेने आयोजित केली मशाल यात्रा

    महिलांच्या शक्तीचा उत्सव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेने आयोजित केली मशाल यात्रा

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) शाखा भुसावळ ने महिलांसाठी भव्य मशाल यात्रा आयोजित केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना जागरूक करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची महती समाजात पोहोचवणे हा होता. यात्रा अष्टभुजा माता मंदिर,येथून सुरू झाली लक्ष्मी चौक मार्गे आणि शिव स्मारक येथे समारोप झाला. यावेळी शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

    कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून रजनी ताई सावकारे, संगीताताई बियाणी, आणि अभाविप प्रदेश मंत्री वैभविताई ढीवरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी शहर मंत्री वैष्णवी कोळी यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आजच्या समाजात दिशा आणि प्रेरणा दिली आहे. महिलांनी या विचारांचा अंगीकार करून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा.”

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेने परिसरात निर्माण केला उत्साह, विद्यार्थ्यांनी दाखवला उत्कृष्ट प्रतिसाद

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेने परिसरात निर्माण केला उत्साह, विद्यार्थ्यांनी दाखवला उत्कृष्ट प्रतिसाद

    श्रीराम मित्र मंडळ कुऱ्हे पानाचे तर्फे आयोजित शिव जयंती वकृत्व स्पर्धेने परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला. पोवाडा गायन,विविध वकृत्व व काव्यात्मक प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि आपल्या भाषण कौशल्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

    स्पर्धेतील विजयी
    (मोठा गट)
    अनिकेत कौतिक राजोळ
    प्रथम
    20 mark भाषण

    प्रेरणा सुनिल धोटे
    प्रथम
    20 mark पोवाडा

    पुर्वा प्रविण बडगुजर
    यश नारायण सपकाळे
    द्वितीय
    18 mark भाषण

    ज्ञानदा उमेश बड‌गुजर
    द्वितीय
    19 mark पोवाडा

    मानवी प्रविण बिलवाड
    तृतीय
    18 mark गीत

    लहान गट
    हिंदवी विश्वास पाटील
    प्रथम (भाषण)
    गणेश योगेश बोबडे
    द्वितीय (भाषण)

    विरेंद्र सुनिल सपकाळे
    रिध्दी सतिष पाटील
    तृतीय

    कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांचा आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्पर्धेने परिसरातील नागरिकांमध्ये देखील सकारात्मक वातावरण निर्माण केले. अनेकांनी आपल्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे उत्साहीपणे स्वागत केले.

    शिव जयंतीच्या उपलक्ष्याने घेतलेल्या या कार्यकमाने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्जवल करण्याचा एक महत्त्वपूर्ण पायंडा ठरला.

    कार्यक्रमात वक्ते श्री मयूरजी देशमुख ऑर्डनन्स फॅक्टरी ,वरणगाव म्हणून तर प्रमुख पाहुणे आर ए पाटील सर आणि योगेश गांधेले सर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला, असे आयोजकांनी सांगितले.

  • आज भुसावळमध्ये महिलांसाठी ऐतिहासिक मशाल यात्रा, १९ फेब्रुवारी २०२५

    आज भुसावळमध्ये महिलांसाठी ऐतिहासिक मशाल यात्रा, १९ फेब्रुवारी २०२५

    आज, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भुसावळमध्ये महिलांसाठी एक ऐतिहासिक मशाल यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित करण्यात आली आहे. यात्रा दुपारी ३ वाजता जामनेर रोडवरील अष्टभुजा माता मंदिराजवळून सुरू होईल आणि समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे होईल.

    ही यात्रा महिलांच्या सामूहिक शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. त्यामध्ये महिलांचा ऐतिहासिक सामर्थ्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील साहसाची प्रेरणा घेत एकजूट आणि ताकद प्रदर्शित केली जाईल.

    अशा प्रकारच्या कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या मशाल यात्रेचा समारोप ऐतिहासिक ठरू शकतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

  • गोरक्षक महाले यांचा सामाजिक उपक्रमाचा अनोखा साक्षात्कार

    गोरक्षक महाले यांचा सामाजिक उपक्रमाचा अनोखा साक्षात्कार


    भुसावळ | मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे श्री. रामेश्वरजी नाईक यांचे कार्य गोरक्षक महाले यांनी विशेष कौतुकास्पद मानले, तसेच त्यांना श्रीमद्भगवद्गीता भेट देऊन सत्कार केला.

    गोरक्षक महाले हे गोमाता आणि मुक्या जीवांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. मात्र, यावेळी त्यांनी माणुसकीचा परिचय देत एका गरीब माता आणि तिच्या तीन वर्षीय बालिकेसाठी महत्त्वपूर्ण मदत मिळवून दिली.

    बालिका चालू शकत नसल्याचे समजल्यानंतर तातडीची मदतीची मागणी

    महाले गोसेवेच्या कामात असताना एका गरीब मातेला आपल्या लहान मुलीसह अडचणीत पाहिले. चौकशीअंती कळाले की, ती बालिका गेल्या तीन वर्षांपासून चालू शकत नाही. तिला चालण्याचा प्रयत्न करत असतानाही यश येत नव्हते.

    महाले यांनी तिला तत्काळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तपासणीत असे आढळून आले की, तीला पोलिओ लस आणि इतर आवश्यक लसीकरण मिळाले नसल्याने तिच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीने तत्काळ घेतली दखल

    ही बाब गंभीर असून अशा अति दुर्गम भागांमध्ये लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे, असे महाले यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सोशल मीडियाद्वारे विनंती केली.

    श्री. रामेश्वरजी नाईक यांनी त्वरित मदतीचे आश्वासन दिले आणि आवश्यक उपचारांसाठी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

    रुग्णवाहतूक खर्च श्री. योगेशजी पाटील यांनी उचलला

    रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी श्री. योगेशजी पाटील यांनी वाहतूक खर्च उचलण्याचा निर्णय घेतला, यामुळे गरजू कुटुंबाला मोठा आधार मिळाला.

    “सदैव पाठीशी आहोत, गरजूंना मदत मिळेल” – श्री. नाईक यांचे आश्वासन

    या प्रसंगी श्री. नाईक यांनी गरजूंसाठी मदत मिळेलच, फक्त संपर्क साधावा असे स्पष्ट केले.

    “माणुसकीसाठी एकत्र या” – गोरक्षक महाले यांचे आवाहन

    गोरक्षक महाले यांनी पोलिओ आणि इतर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अशा घटनांमुळे गरजू लोकांसाठी तत्काळ मदत मिळवून देणे सोपे होते, असेही त्यांनी सांगितले.

    भुसावळकरांची सकारात्मक प्रतिक्रिया

    या घटनाक्रमामुळे भुसावळ आणि परिसरातील नागरिकांनी गोरक्षक महाले, श्री. नाईक आणि श्री. पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.

    🌿 “माणुसकीसाठी एकत्र येऊया – मदतीचा हात पुढे करूया!” 💖

  • स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भावी पदाधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले गाव , मतदारसंघ स्वच्छ व हरितमय करून आदर्श घडवावा . पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भावी पदाधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले गाव , मतदारसंघ स्वच्छ व हरितमय करून आदर्श घडवावा . पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    भावी पदाधिकाऱ्यांसाठी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प
    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना, मतदारसंघातील भावी पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता आणि हरितमय विकासाचा संकल्प घ्यावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

    राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासावर भर द्यावा, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

    स्वच्छ आणि हरित मतदारसंघासाठी पुढाकार

    पर्यावरणाच्या असंतुलनामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भविष्यातील मतदारसंघ अधिक सुंदर आणि निरोगी होण्यासाठी ऑक्सिजनयुक्त वृक्ष, फुलझाडे आणि फळझाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

    “निवडणूक हरलो तरी झाडे आपली आठवण ठेवतील”

    “आपण निवडून आलो किंवा नाही, पण आपल्या परिसरातील झाडे कायमस्वरूपी उभी राहतील आणि मतदारांना आपली आठवण करून देतील.” असे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले आहे. स्वच्छता आणि हिरवाई राखण्यासाठी हा एक आदर्श उपक्रम ठरू शकतो.

    “झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरणाचे रक्षण करा”

    पर्यावरणपूरक मतदारसंघ घडवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबाबदारी स्वीकारू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश आत्मसात करून एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे.

    🌱 “स्वच्छता राखू, निसर्ग वाचवू, हरित महाराष्ट्र घडवू!” 🌎

  • छावा चित्रपट करमुक्त करा शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    छावा चित्रपट करमुक्त करा शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत.

    छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्याचा आलेख असलेला छावा हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. यात रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून. या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच सात कोटी रुपयांचे वर या ठिकाणी७ कोटी रुपयांची प्रि बुकिंग झालेली होती. सुरुवातीलाच आणि नुकताच करोडो रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे .

    या चित्रपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लाभत आहे. स्वराज्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांनी केलेला त्याग घरोघरी मनामनात पोहोचवावा इतिहास जिवंत राहावा यासाठी महाराष्ट्र शासनाने त्वरित हा चित्रपट टॅक्स फ्री करावा. हि विनंती अशा आशयाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे एका पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.