Author: Amit Asodekar

  • राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र — हनुमान भक्तीने भरले वातावरण

    राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र — हनुमान भक्तीने भरले वातावरण

    शहरातील धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय करणाऱ्या संगीतमय हनुमान चालीसा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. जय श्रीरामच्या गजरात भुसावळ शहर राममय झाले होते. कार्यक्रमात ३८ संघटनांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली.

    कार्यक्रमाची सुरुवात प्रभु श्रीराम व बजरंगबलीच्या प्रतिमेचे माल्यार्पण व विधीवत पूजन करून झाली. भक्तिभावात न्हालेल्या वातावरणात संगीतमय हनुमान चालीसा सादर झाली आणि उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

    या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे राज्याचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले मा. ना. गिरीश महाजन (जलसंधारण, कुंभमेळा आणि आपदा व्यवस्थापन मंत्री) यांची उपस्थिती.
    तसेच वस्त्रउद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय सावकारे यांनीही भक्तिभावाने हजेरी लावली.

    कार्यक्रमात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. राहुल वाघ साहेब यांची उपस्थिती लाभली.

    हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद, क्रीडा भारती, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.संगीतमय हनुमान चालीसेच्या माध्यमातून जनजागृती व एकात्मतेचा प्रसार करण्यात आला.

    जाहिरात 👇

  • भुसावळमध्ये भाजपा स्थापना दिन जल्लोषात; महाराष्ट्रात 1.50 कोटी सभासदांचा टप्पा पार, भुसावळ तालुक्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    भुसावळमध्ये भाजपा स्थापना दिन जल्लोषात; महाराष्ट्रात 1.50 कोटी सभासदांचा टप्पा पार, भुसावळ तालुक्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद


    भुसावळमध्ये भाजपा स्थापना दिन जल्लोषात; 1.50 कोटी सभासदांचा टप्पा पार, भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


    भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन भुसावळ शहरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. याच वेळी पक्षाने 1 कोटी 50 लाख सभासद संख्या गाठल्याची घोषणा करत सर्व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

    विशेषतः भुसावळकरांनी या सभासद नोंदणी मोहीमेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी भाजपा परिवारात सहभागी होत पक्षाच्या बळकटीकरणात मोलाचा वाटा उचलला.

    मंत्री संजय सावकारे यांनी भाषणातून पक्षाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भुसावळच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले. “भुसावळ हे पक्षासाठी नेहमीच कणा ठरले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

    जाहिरात 👇

  • “तिव्र उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षा लवकर घेण्याची मागणी “

    “तिव्र उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षा लवकर घेण्याची मागणी “

    भुसावळ – एप्रिल महिन्यात उन्हाचा तीव्र परिणाम होत असल्याने इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन परीक्षा 10 एप्रिलपर्यंत आटोपावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भुसावळ यांच्याकडे केली आहे.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा:
    सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची तीव्रता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात.

    शिवसेनेचा इशारा:
    गेल्या अनेक वर्षांपासून या परीक्षा मार्च महिन्यात सुरू होऊन 10 एप्रिलपर्यंत संपत असतात. मात्र, यंदा त्या 28 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. जर उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

    पालकांची चिंता:
    विद्यार्थ्यांच्या परीक्षा उन्हाच्या कडाक्यात होत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक पालकांनीही परीक्षा लवकर घेण्याची मागणी केली असून, प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    शिक्षण विभागाची प्रतिक्रिया:
    या मागणीवर शिक्षण विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, हा विषय गंभीर असल्याने लवकरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

    पुढील पाऊल:
    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या या मागणीला प्रशासन कसा प्रतिसाद देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जर परीक्षा लवकर न घेण्याचा निर्णय घेतला गेला, तर पक्षाने आंदोलनाचीही तयारी सुरू केल्याचे समजते.

  • 21 मार्च जागतिक वनदिनाच्या निमित्ताने वनसंवर्धन करूया, पर्यावरणाचा समतोल राखूया, पृथ्वीला वाचवूया . पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    21 मार्च जागतिक वनदिनाच्या निमित्ताने वनसंवर्धन करूया, पर्यावरणाचा समतोल राखूया, पृथ्वीला वाचवूया . पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

    दिनांक 21 मार्च 2025 जागतिक वनदिवस हा दिवस म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने पूर्व सूचना असून वने जंगल ही आपणास म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. प्राणी, पशु पक्षी यांचं आश्रयस्थान म्हणजे घनदाट जंगल ती आपली नैसर्गिक संपत्ती आहे तिला जतन करण्याचा हा संकल्प दिवस आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम द्वारे 21 मार्चपासून त्यात थीमचा प्रसार वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे करण्यात येतो. 21 मार्च 2025 याची थीम ॔॔॔॔ वने आणि अन्न ॓ अशी आहे. असे डॉ.सुरेंद्र सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी सर्वांना पोषण व उपजीविकेसाठी जंगलाचे महत्व व त्याचे पर्यावरणासाठी योगदान किती महत्त्वाचे आहे. त्याचा प्रसार करण्यात येतो. वने हे पृथ्वीवरचा आधारस्तंभ आहे आपण घेत असलेले ऑक्सिजन हवा, पिण्याचे पाणी, अन्न ,औषध निवारा या मूलभूत गरजा सर्व जंगलाची निगडित आहेत जंगले मातीची सुपीकता राखण्यास जलश्रोताचे संरक्षण करण्यास जैवविविधतेला पाठिंबा देण्यास मदत करत असता जंगले फळे काजू औषधी वनस्पती वन्य वनस्पती पृथ्वीवरील सर्व सजीवांना आवश्यक असलेले अन्नश्रोत निर्माण करण्याचे काम करत असतात अलीकडे असा अहवाल आला आहे की अमेरिकेतून आणलेल्या फुलझाडं घाणेरी ओ साडी जंजिरे टाकळा तीकोमा कॉसमॉस रानमारी हे दिसण्यास सुंदर असलेले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे आपले स्थानिक प्रजातींचे झाडं झुडपं वेलवर्गीय वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तसेच गवताच्या प्रजाती उपयुक्त व पर्यावरण पूरक वनस्पतींचा नाश होत आहे त्यामुळे प्राण्यांची उपासमार होत आहे. जंगली प्राणी पशुपक्षी जंगल नष्ट झाल्याने पाण्याची उपलब्धता नसल्याने तेथील प्राणी शेतामध्ये शेतांची नासधूस करत असतात तसेच गावातही येत असतात प्रत्येकाने पर्यावरण जतन राहण्याच्या दृष्टीने आजच्या पिढीने विदेशी झाडे लावू नये स्वदेशी व पर्यावरण पूरक झाडे लावावे जंगलतोड थांबवण्याचा संकल्प करावा तसेच आजच्या पिढीला जंगलाचे महत्त्व व संवर्धन करणे किती गरजेचे आहे हे 21 मार्च जागतिक वन दिन पासून पुढे वेबिनार ,कार्यशाळा यांचे आयोजन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. याची माहिती द्यावी. पृथ्वीवरील सर्व सजीवांचे एकमेकांकरता राहणे पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे आहे.

  • 22 मार्च जागतिक जल दिन सर्वांनी विविध माध्यमातून जल प्रतिज्ञा घेत साजरा करावा. पर्यावरण तज्ञ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र

    22 मार्च जागतिक जल दिन सर्वांनी विविध माध्यमातून जल प्रतिज्ञा घेत साजरा करावा. पर्यावरण तज्ञ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र

    22 मार्च जागतिक जल दिन त्यानिमित्त आपल्या राज्यात 16 मार्च ते 22 मार्च पर्यंत जल सप्ताहाचा आयोजन करण्यात आलेले असल्याचे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील. सांगत . पाणी हेच जीवन असून आपणास व आपल्याबरोबर सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी प्राणवायू सोबत आवश्यक असलेले पाणी निसर्गाकडून ही मिळालेली अनमोल देणगी असून तिचे जतन करणे व त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे पाण्याशिवाय पृथ्वीवरील सर्व सजीव जिवंत राहू शकत नाही. 22 मार्चपर्यंत असलेल्या या सप्ताहात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय महाविद्यालय पूर्व माध्यमिक माध्यमिक शाळा तसेच सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा तालुका व गाव पातळीवर चर्चासत्र कार्यशाळा जलदिंडी प्रभात फेरी या अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून जलप्रतिज्ञा चे आयोजन करण्यात यावे. पृथ्वीवरील पाण्याचा मोठ्या प्रमाणात मानव वापर करत त्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत पाणी जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग शोषखड्डे हे सुद्धा पाणी टिकण्यासाठी महत्त्वाचे असून त्याचे महत्त्व या निमित्ताने सांगावे. शासनामार्फत ठिकठिकाणी बंधाऱ्यांची तसेच शेततळे पाणी टिकवण्यासाठी निर्मिती करणे आवश्यक असल्याचे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील त्यांनी सांगितले तसेच पाणी टिकण्यासाठी व काटकसरीने वापरण्यासाठी विविध ठिकाणी जलप्रतिज्ञाचे जलसप्ताहच्या निमित्ताने प्रत्येकाने घ्यावी. जल प्रतिज्ञा खालील प्रमाणे

  • प्राकृतिक रंगों से सजी होली: सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट की पहल से पर्यावरण संरक्षण का संदेश

    प्राकृतिक रंगों से सजी होली: सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट की पहल से पर्यावरण संरक्षण का संदेश

    वढोदा फैजपूर स्थित निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केयर सेंटर में आज, 19 मार्च को सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा प्राकृतिक रंगों से होली मनाई गई। इस अनूठी होली के दौरान, कोई भी रासायनिक रंग का उपयोग नहीं किया गया, बल्कि विभिन्न प्राकृतिक रंगों का उपयोग किया गया, जैसे कि टेसु, चंदन, गुलाब जल, मुलतानी मिट्टी, नीम, पलाश, गोपी चंदन, हल्दी और भस्म।

    यह आयोजन विशेष रूप से पर्यावरण संरक्षण की दिशा में एक कदम था, जहां भक्तों ने संत प.पू.महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज के सानिध्य में मिलकर रंगों की होली खेली। संतों के साथ होली के रंगों में सराबोर होने से पूरे वातावरण में एक अद्वितीय आध्यात्मिक और उत्सवपूर्ण माहौल बना।

    इस कार्यक्रम ने न केवल होली के पारंपरिक रंगों को मनाया बल्कि प्राकृतिक रंगों के महत्व को भी उजागर किया।

    सतपंथ ट्रस्ट के इस आयोजन ने भक्तों को प्राकृतिक संसाधनों की महत्ता और पर्यावरण के प्रति जागरूकता का संदेश दिया।
    सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित इस विशेष आयोजन में धार्मिक आयोजनों के साथ-साथ रंगों से भरपूर हंसी-मजाक का माहौल था।
    इस आयोजन ने न केवल परंपरा को संरक्षित किया, बल्कि पर्यावरण के प्रति जागरूकता भी बढ़ाई।

  • सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात कार्य करणारा तळपता सूर्य अस्तास गेला…..

    सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात कार्य करणारा तळपता सूर्य अस्तास गेला…..

    गेल्या सात दशकापासून जळगाव जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कृषी ,पर्यावरण गोशाळा अशा विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेतून कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बापूराव मांडे.. शालेय जीवनापासूनच बापूरांवर संघ शाखेचे संस्कार झाले होते असंख्य संघाचेकार्यकर्ते ,पूर्णवेळ प्रचारक यांचे कार्य बापुराव यांनी जवळून पाहिले होते म्हणून पुढील काळात बापूराव काही काळासाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून निघाले नांदेड जिल्ह्यात त्यांनी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य केले.. त्यानंतर त्यांनी अर्थार्जनासाठी टू व्हीलर दुरुस्ती मोटर गॅरेज सुरू केले, त्यानंतर एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले.. एलआयसी चे काम करत असताना दहा महिने संघ काम आणि उर्वरित दोन महिने एलआयसी एजंट म्हणून कार्य असं त्यांनी ठरवून घेतले होते अविरतपणे कार्य करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे 1975 ते 90 च्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये संघ कार्याचा वटवृक्ष त्यांनी उभा केला.. जळगाव जिल्ह्य कार्यवाह म्हणून दायित्व असताना प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्ह्यात त्या काळात 101 संघ शाखा उभ्या केल्या होत्या..शाखेच्या या आकडेवारीवरून त्या काळात आपला जळगाव जिल्ह्य़ा महाराष्ट्रात क्रमांक एक वर होता. श्रीराम मंदिर आयोध्या कार सेवा कालखंडात बापूरावांकडे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी होती.. या काळात असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी कार सेवेला नेले होते.. पुढील काळात बापूरावनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याच्या हेतूने त्या काळच्या भुसावळ एज्युकेशन सोसायटी सध्याच्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळात कार्य सुरू केले.. बापूरावांच्या काळात संस्थेच्या विविध शाळांचे नामकरण, संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम, संस्थेच्या तीनही शाळांची सुसज्ज इमारत .. अशा असंख्य कार्याची पूर्तता झाली.. आज रोजी , मुक्ताई शिशु मंदिर ,जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, महाराणा प्रताप विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, हरिपूर आश्रम शाळा .. शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या शाळा अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत ..
    साधारणता 1998 ला शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विविध आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना देखील शिक्षण आणि संस्कार मिळावे या हेतूने बापूरावांनी सातपुड्याच्या पायथ्याशी हरीपुरा येथे आश्रम शाळा सुरू केली त्यानंतर गोवंश वाढला पाहिजे या हेतूने तेथे इच्छापूर्ती गोशाळेची निर्मिती केली सोबतच बायोगॅस निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केले.. हरीपुराच्या उजाड अशा जमिनीमध्ये बापूरावांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आणि नंदनवन फुलविले.. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी भूषण आणि वनश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.. कार्य मग्नता जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती या पद्याप्रमाणे माननीय बापूराव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य करतच राहिले .
    रविवार दिनांक 16 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.. आणि तळपत्या सूर्याचा अस्त झाला.. बापूरावांच्या कार्याला मानाचा मुजरा..बापूराव च्या अचानक निघून जाण्यामुळे त्यांच्या असंख्य चाहत्यांना जे तीव्र दुःख झाले आहे ते शब्दात मांडणे कठीण आहे….. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो,मांडे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांचे दुःख, वेदना कमी करो हीच प्रार्थना.. बापूरावांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सोनू मांडे, सून , दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे..

    बापूरावांच्याच कार्यपथावर त्यांचे चिरंजीव सोनू मांडे मार्गक्रमण करीत आहेत…….

  • एन.के. नारखेडे स्कूलमध्ये स्केटिंग स्टार तीर्थराज पाटीलचा सत्कार

    एन.के. नारखेडे स्कूलमध्ये स्केटिंग स्टार तीर्थराज पाटीलचा सत्कार

    एन.के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता १ ली चा विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील याने नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर ६ गटात दुसरा क्रमांक मिळवला. त्याला १ सिल्वर व १ ब्रांज मेडल मिळाले. याचबरोबर, त्याची निवड २०२५ मध्ये थायलंडमध्ये होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांनी त्याचे कौतुक केले आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

  • तीर्थराज पाटील अंतरराष्ट्रीय खेळात गेल्याचा आम्हाला खुप अभिमान-सरपंच सौ विद्या भारसके

    तीर्थराज पाटील अंतरराष्ट्रीय खेळात गेल्याचा आम्हाला खुप अभिमान-सरपंच सौ विद्या भारसके

    तळवेल गावातील रहिवासी एम ई एस चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष पुरुषोत्तम पाटील यांचा नातू तिर्थराज मंगेश पाटील हा गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून सहभागी स्पर्धकांमध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर 6 या गटा मध्ये तळवेल ह.मु .भुसावळ येथील तिर्थराज मंगेश पाटील देशात दुसरा नंबर घेऊन 1 सिल्वर मेडल व 1 ब्रांज मेडल मिळवले व पुढील जुन महिन्याच्या थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तीर्थराचे निवड झाल्याबद्दल सरपंच सौ विद्या उल्हास भारसके उपसरपंच सौ सुवर्णा अमोल पाटील व ग्रा प सदस्या सौ स्मिता रविंद्र पाटील ग्रा प सदस्या सौ मनिषा सुधिर पाटील ग्रा प सदस्या सौ लतिका निलेश पाटील ग्रा प सदस्या सौ रत्ना किशोर कोळी ग्रा प सदस्या सौ छाया संतोष पाटील ग्रा प सदस्या श्रीमती कांताबाई भिमराव गुरचळ ग्रा प सदस्या सौ प्रमिला संजय गुरचळ ग्रा प सदस्य श्री सोपान मुरलीधर पाटील ग्रा प सदस्य श्री तुषार देविदास पाटील ग्रा प सदस्य श्री उल्हास रामदास भारसके ग्रा प सदस्य
    श्री किशोर काशिनाथ कोळी ग्रा प सदस्य श्री संतोष ज्ञानदेव झोपे ग्रामसेवक श्री डी सी इंगळे साहेब व कर्मचारी मंडळी यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी उल्हासभाऊ भारसके यांनी मार्गदर्शन केले

  • महादेवकी कृपा प्राप्ति के लिए विशेष उपाय

    महादेवकी कृपा प्राप्ति के लिए विशेष उपाय

    यदि आप शिवभक्त हैं और जीवन में किसी भी तरह की परेशानी का सामना कर रहे हैं, तो यह उपाय आपके लिए अत्यंत लाभकारी होगा। यह उपाय सरल है और आपको महादेव की कृपा शीघ्र प्राप्त होगी।

    यह उपाय कौन कर सकता है?

    यदि आपके जीवन में दुख खत्म नहीं हो रहा है, नौकरी या व्यापार में समस्या आ रही है, या फिर स्वास्थ्य संबंधी परेशानी बनी हुई है, तो यह उपाय अवश्य करें।

    उपाय करने की विधि:

    1. आवश्यक सामग्री:
      • एक बेलपत्र
      • एक दुर्वा
      • एक चावल का दाना
    2. उपाय करने का तरीका:
      • इन सभी सामग्रियों को अपने हाथ की हथेली में रखें।
      • घर में बैठकर १०८ बार “श्री शिवाय नमस्तुभ्यं” मंत्र का जाप करें।
      • इसके बाद इन तीनों वस्तुओं को अपने घर में जहां पानी रखा जाता है (घड़ा, मटका, बाल्टी आदि) वहाँ स्पर्श कराएं।
      • फिर इन्हें किसी शिव मंदिर में शिवलिंग पर चढ़ाएं और “श्री शिवाय नमस्तुभ्यं” मंत्र का उच्चारण करें।
      • महत्वपूर्ण निर्देश:
        • जब आप मंदिर में यह उपाय कर रहे हों, तो उत्तर दिशा की ओर मुख करके बैठें।
        • शिवलिंग के उस हिस्से की ओर बैठें, जहाँ से जलधारा गिरती है।

    यह उपाय कितने दिन करना है?

    गुरुजी ने किसी विशेष दिन की बाध्यता नहीं बताई है, लेकिन सोमवार से शुरू करके इसे १५ से २० दिन तक नियमित रूप से करें।

    अगर आप यह उपाय श्रद्धा और विश्वास के साथ करते हैं, तो महादेव आपके सारे दुखों को हर लेंगे और सुख-समृद्धि प्रदान करेंगे।

    महत्वपूर्ण सूचना:

    यदि आपको यह उपाय अच्छा लगे, तो इसे अपने परिवार और मित्रों के साथ साझा करें।