Author: Amit Asodekar

  • भारताची दहशतवादावर जोरदार कारवाई: अझहर मसूद व हाफिज सईदच्या अड्ड्यांवर हल्ला

    भारताची दहशतवादावर जोरदार कारवाई: अझहर मसूद व हाफिज सईदच्या अड्ड्यांवर हल्ला

    भारताने दहशतवादाच्या विरोधात मोठी आणि ठोस पावले उचलत जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली.हल्ल्याची ठिकाणे व लक्ष्य:पंजाबमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहंमदच्या लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.जैशचा प्रमुख अझहर मसूद काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सुरक्षित अड्ड्यावर लपून बसल्याची माहिती आहे.यासोबतच पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे लष्कर-ए-तोयबाच्या अड्ड्यांवरही तडाखेबंद कारवाई झाली.

    हाफिज सईदच्या अड्डाला धक्का:लष्करचा प्रमुख हाफिज मोहमंद (सईद) ISI च्या सेफ हाऊसमध्ये असल्याचे उघड झाले असून, त्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले.

    source https://x.com/ANI

  • दा दे ना भोळे महाविद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100%

    भुसावळ: येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी विज्ञान शाखेने १००% निकालाची घौडदौड कायम ठेवली आहे. याशिवाय कला आणि वाणिज्य शाखांमध्येही घवघवीत यश मिळाले आहे.

    विज्ञान शाखा – १००% निकाल

    प्रथम क्रमांक: कु. पाटील मानसी पंकजकुमार – ५३५ गुण (८९.१७%)द्वितीय क्रमांक: कु. फेगडे दिशा अनिल – ५३२ गुण (८६.६७%)तृतीय क्रमांक: धांडे श्रेयस खिलचंद – ५३१ गुण (८८.५०%)

    कला शाखा – ९०% निकाल प्रथम क्रमांक: वाढे निर्मल विजयकुमार – ४२३ गुण (७०.५०%)द्वितीय क्रमांक: कु. काकडे ममता गोविंदा – ३७० गुण (६१.६७%)तृतीय क्रमांक: कु. गांधेले दिशा दत्तू – ३६५ गुण (६०.८३%)वाणिज्य शाखा – ९०% निकालप्रथम क्रमांक: पाटील यदनेश उल्हास – ३८५ गुण (६४.१७%)द्वितीय क्रमांक: कोलते रुद्रप्रकाश यशवंत – ३८४ गुण (६४%)तृतीय क्रमांक: कु. वारके हेमांगी लक्ष्मण – ३६४ गुण (६०.६७%)

    यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

  • क्रिडा मैदाने सांस्कृतिक मेळ्यांच्या वापरासाठी नाहीत — क्रीडाप्रेमींचा आक्रोश

    क्रिडा मैदाने सांस्कृतिक मेळ्यांच्या वापरासाठी नाहीत — क्रीडाप्रेमींचा आक्रोश

    येथील एकमेव प्रमुख क्रीडा मैदान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (जुने डी.एस. ग्राउंड) वर आनंद मेळा भरवण्यास विरोध करत क्रीडाप्रेमींनी मुख्याधिकारी यांच्याकडे सविनय निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी मैदानाचा वापर केवळ क्रिडा आणि व्यायाम यासाठीच व्हावा, अशी मागणी केली आहे.

    निवेदनात असे नमूद करण्यात आले की, सदर मैदानावर महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक दररोज क्रिकेट, रनिंग, व्यायाम आणि स्पर्धा परीक्षेचा सराव करणारे युवक सराव करतात. मात्र, न.पा. प्रशासनाने 2 मे ते 31 मे 2025 या कालावधीसाठी आनंद मेळ्यास परवानगी दिली आहे, ज्यामुळे मैदानाची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.

    सागर तायडे, अक्षय पवार, लव वामन झाडगे,दीपक सोनवणे, संदिप चव्हाण यांच्यासह अनेक खेळाडूंनी स्वाक्षरी करून दिलेल्या निवेदनात असा इशारा दिला आहे की, जर मैदानावरील आनंद मेळा रद्द करण्यात आला नाही, तर 5 मे 2025 पासून मुख्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

  • मुलींसाठी स्वरक्षण शिबिर — लाठी-काठी प्रशिक्षण १५ ते २५ मे दरम्यान भुसावळ येथे

    मुलींसाठी स्वरक्षण शिबिर — लाठी-काठी प्रशिक्षण १५ ते २५ मे दरम्यान भुसावळ येथे

    भुसावळ येथील विश्वहिंदु परिषद, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने फैजपूर येथील प.पु.स.गु. महामंडेलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गावाहिनी मुलींसाठी स्वरक्षणासाठी लाठी काठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

    हे शिबीर दि. १५ ते २५ मे २०२५ दरम्यान सकाळी ६.३० ते ८.३० व संध्याकाळी ६.३० ते ९.०० यावेळेत येथील संतोषीमाता बहुद्देशीय हॉल शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.

    शिबीरात प्रशिक्षक कु.परि जीवन महाजन या आहेत. अधिक माहितीसाठी कु. सोनल शर्मा व कु. सारिका पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

    “स्वरक्षण हेच खरे रक्षण” या उद्देशाने आयोजित या शिबिरात जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    जाहिरात 👇

  • पाक झेंड्याची विटंबना करीत भुसावळ भाजपाचा निषेधात्मक आवेश

    पाक झेंड्याची विटंबना करीत भुसावळ भाजपाचा निषेधात्मक आवेश

    काश्मीरच्या पहेलगाम भागात नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भुसावळ शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात 26 निरपराध भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे.या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष भुसावळ शहराच्या वतीने आज सकाळी कल्पना रसवंती जवळ पाकिस्तानविरोधी तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पाकिस्तानच्या झेंड्याची विटंबना करण्यात आली व रस्त्यावर झेंडा चिकटवून त्यावर पाय देत संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.लहान मुलांनी पाकिस्तान च्या झेंड्यावर लघुशंका करून निषेध व्यक्त केला.मोर्चात “पाकिस्तान मुर्दाबाद”, “वंदे मातरम्”, “भारत माता की जय”, “जय श्रीराम” अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकण्यात आला.

    या आंदोलनात भारतीय जनता पार्टी दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे ,राजेंद्र नाटकर ,परीक्षित बऱ्हाटे,पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर ,निकी बत्रा ,गिरीश महाजन ,शैलेजा पाटील ,पुरुषोत्तम नारखेडे ,बोधराज चौधरी, शहर सरचिटणीस श्रेयस इंगळेगौरव आवटे ,जयंत माहुरकर ,धनराज बाविस्कर ,राहुल तायडे ,अल्बर्ट तायडे , मिथुन बारसे,लखन रणधीर ,गोपी सिंग राजपूत ,कैलास शेलोडे, मुकेश मोरे ,भरत उमरिया ,चेतन बोरोले यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आघाडी संघटनांचे पदाधिकारी परिसरातील दुकानदार, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

    जाहिरात 👇

  • भुसावळमध्ये पाकिस्तानचा निषेध: भाजपाच्या वतीने आज पाकिस्तान चा झेंडा पायाखाली तुडवला जाणार

    भुसावळमध्ये पाकिस्तानचा निषेध: भाजपाच्या वतीने आज पाकिस्तान चा झेंडा पायाखाली तुडवला जाणार

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचे बळी गेल्याने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पाकपुरस्कृत दहशतवादाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या मोर्चात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर टाकून त्याची विटंबना करून तीव्र निषेध करण्यात येणार आहे. कल्पना रसवंतीजवळ हे आंदोलन होणार असून, शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, आघाडी संघटनांचे प्रतिनिधी, युवा मोर्चा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

    हा मोर्चा भाजपा शहराध्यक्ष किरण भाऊ कोलते (दक्षिण विभाग), जिल्हा सरचिटणीस परिक्षित भाऊ ब-हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश भाऊ सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल भाऊ जोशी, शहराध्यक्ष (उत्तर विभाग) संदीप भाऊ सुरवाडे, माजी शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

    जाहिरात👇

  • भुसावळ चा तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी

    भुसावळ चा तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी

    रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित 43 व्या ऑल इंडिया रोलर रिले चैम्पियनशिप संभाजीनगर येथे दिनांक 25 एप्रिल 2025 पासून ते 27 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये तामिळनाडू कर्नाटक सह महाराष्ट्रातील पुणे नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली जळगाव सह अन्य भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता की या नॅशनल लेव्हलच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने अंडर ऐट गटामध्ये तीन मॅच मध्ये एक सिल्वर दोन ब्रांज मेडल मिळवून विजय मिळवला आहे तिर्थराज हा या आधी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत थायलंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती

    या निवडीमध्ये त्याचे कोच सिल्वर लाईन स्पोट्स एकडमी चे पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर यांनी त्याला प्रतिक्षण दिले व मार्गदर्शन केले त्याला स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे खेळता यावं यासाठी एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला छान सहकार्य व मार्गदर्शन केले आहे तो जुन महिन्यात थायलंड देशामध्ये पटाया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्याच्या निवडीबद्दल त्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अमोलभाऊ जावळे खासदार स्मिताताई वाघ आमदार श्री राजुमामा भोळे यांनी अभिनंदन केले तिर्थराज पाटील हा मुळ तळवेल येथिल रहिवासी असून हल्ली शिवशक्ती हुडको कॉलनी भुसावळ येथे राहतो तो सेवानिवृत्ति मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विस चे कर्मचारी सुभाष पाटील यांचा नातू व मंगेश पाटील यांचा मुलगा आहे

    जाहिरात 👇

  • गरुड पुराण हीच माझी प्रेरणा,योगेश पाटीलवासुदेव जेष्ठ नागरिक संघाद्वारे सत्कार

    गरुड पुराण हीच माझी प्रेरणा,योगेश पाटीलवासुदेव जेष्ठ नागरिक संघाद्वारे सत्कार

    माझ्या वडीलांना देवआज्ञा झाल्यावर घरी गरुड पुराणाचा पाठ करण्यात आला.त्यातील विविध कथा ऐकत असतांना ते दृश्य डोळ्यासमोर सरकत होते. वडिलांचा अंत्यविधी मी मुलगा म्हणुन केला पण ज्यांना कोणी नाही अश्या बेवारस नागरिकांचं मृत्यूनंतर काय? हाच विचार मला प्रेरणा देत गेला आणि मागील तीन वर्षांपासून शहरातील बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी मी स्वखर्चाने करत आहे. असे प्रतिपादन शासकीय ठेकेदार योगेश पाटील यांनी केले.आज भुसावळ येथील रिंग रोड जवळील रामदेवबाबा योग हॉल येथील वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव सतीश जंगले, सहसचिव संजय चौधरी,उपाध्यक्ष भानुदास पाटील आणि मार्गदर्शक धनराज पाटील होते. पुढे योगेश पाटील म्हणाले की,आतापर्यंत 117 बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.बेवारस मृतदेह यांची अंत्यविधीची जबाबदारी सोबत आमच्या गो शाळेत 45 गाई आहेत.या गाई आम्ही कसाई यांच्यापासून सुटका करत जमा केल्या आहेत. तसेच कुठल्याही जखमी अवस्थेत असलेल्या गोमाता याचा उपचार देखील आमची टीम करते.

    यावेळी लीलाधर पाटील,विश्वनाथ वाणी,सुरेश करंदीकर,रमेश भोगे, भानुदास पाटील, लोटू फिरके,संजीव चौधरी, नरेंद्र महाजन, खुशाल महाजन, यशवंत वारके, विकास राणे,ज्ञानदेव पाटील,तुकाराम पाटील,पांडुरंग पाटील,गणेश सरोदे,दिलीप मराठे, प्रमोद बोरोले, इंदूबाई सपकाळे,लता जंगले, वैशाली पाटील, रजनी राणे, विजया भारंबे, प्रमिला धांडे,रत्ना बोरॉले,भास्कर खाचणे,अशोक नेहेते आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. एप्रिल महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत असे सभासद जेष्ठ नागरिक सुरेश करंदीकर, खुशाल महाजन, लीलाधर पाटील,रवींद्र नारखेडे, वैशाली पाटील यांचे वाढदिवस उपरणे आणि पुष्पहार देत साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले,प्रस्तावना प्रकाश पाटील तर आभार संजय चौधरी यांनी मांडले.

  • भोरगाव लेवा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी शिशिर जावळे

    भोरगाव लेवा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी शिशिर जावळे

    भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाची कार्यकारणी नुकतीच भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. लेवा समाजाच्या सर्वांगीण हितासाठी , सामाजिक उपक्रम राबवणारी, समाजातील अनिष्ट चालीरीतीं विरुद्ध लढणारी,तथा न्यायनिवाडा करणारी भोरगाव लेवा पंचायत एक सामाजिक संस्था आहे सदर संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील घटकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. या संस्थेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर व इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असून ही संस्था निस्वार्थ सेवाभावी कार्य करणारी एक आदर्श सामाजिक संस्था आहे. आणि अशा या संस्थेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा या उद्देशाने भोरगाव लेवा पंचायतीतर्फे प्रथमच भुसावळ विभागात युवकांची कार्यकारणी निवड करण्यात आली.

    याप्रसंगी गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार कार्यकारणी निवड बैठकीवेळी घेण्यात आला आणि या बैठकीत भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते , लेवा हितवादी चळवळीचे प्रणेते तथा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे सचिव शिशिर दिनकर जावळे यांची भोर गाव लेवा पंचायती च्या भुसावळ विभागाचे युवा उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

    याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ चे सचिव सुभाष भंगाळे ,प्रा धीरज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते . देवा समाजाच्या सर्वांगीण उत्पन्नासाठी विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे समाजकार्य करणार असल्याचे शिशिर जावळे यांनी यावेळी मनोदय व्यक्त केलेला आहे.त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

  • ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कबड्डी स्पर्धेसाठी चेतन पाटील हिमाचल रवाना – जय मातृभूमी क्रीडा मंडळातर्फे भव्य निरोप समारंभ

    ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कबड्डी स्पर्धेसाठी चेतन पाटील हिमाचल रवाना – जय मातृभूमी क्रीडा मंडळातर्फे भव्य निरोप समारंभ

    महाराष्ट्र राज्य महावितरण महिला व पुरुष कबड्डी संघ 46 वी ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी कबड्डी टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी हिमाचल प्रदेश, शिमला येथे 27 ते 29 एप्रिल दरम्यान रवाना होत आहे. या संघात कोल्हापूर, रत्नागिरी, कल्याण, मुंबई, नागपूर, अकोला, मुख्यालय मुंबई आणि जळगाव येथील खेळाडूंना संधी मिळाली असून, भुसावळचे गौरव असलेले जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय कबड्डीपटू श्री. चेतन पाटील यांचाही समावेश आहे.या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्थानक येथे जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. वरुण इंगळे, सचिव श्री. प्रकाश सावळे तसेच संपूर्ण मंडळ, खेळाडू व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत चेतन पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.