“तापी माई जन्मोत्सव: सूर्यकन्या तापी माईस अर्पण होणार दीपसागर – दीपोत्सवाची जय्यत तयारी

भुसावळ शहराच्या श्रद्धेचं प्रतीक असलेली तापी नदी, ही केवळ एक जलवाहिनी नसून शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाची शुद्ध मूर्त प्रतिमा मानली जाते.

याच सूर्यकन्या तापी माईचा जन्मोत्सव यंदा २ जुलै २०२५, बुधवार रोजी महादेव घाट, तापी नदी किनारी भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

या विशेष सोहळ्याचं आयोजन समस्त भुसावळकर नागरिकांच्या पुढाकारातून करण्यात आलं आहे. कार्यक्रमात तापी नदी पूजन, महाआरती आणि दीपोत्सवाचे आयोजन असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेलं असेल.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार असून, आयोजकांनी नागरिकांना आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण: तापी माई, महादेव घाट, भुसावळ बुधवार, २ जुलै २०२५वेळ सकाळी ११ वाजल्यापासून

कार्यक्रमाचे समन्वयक मंगेश पि. भावे (९५९५८४८०४३) व हरीश अ. लोखंडे (९०९६६१९९६४) हे असून, त्यांनी सांगितले की “तापी माई ही आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा हा सोहळा एक सामाजिक एकतेचं आणि संस्कृतीचं प्रतीक ठरणार आहे.”

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *