जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षी विविध वयोगटात ॲथलेटिक्स खेळात उत्कृष्ठ कामगिरी करणारे खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात त्यात खेळाडूची गत वर्षाची कामगिरी लक्षात घेतली जाते सन २०२४-२०२५ या वर्षाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा आज शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी आप्पासाहेब डॉ.नारायण खडके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारर्थी किशोर चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, इकरा एज्युकेशन सोसायटीचे एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांदखान पठाण, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील यांची उपस्थिती होती.

सन २०२४-२०२५ चे पुरस्कार सिनियर गटातून दिनेश किसन पाटील (पारोळा), महाविद्यालयीन गटातून कुलदिप छोटू पाटील (चोपडा), ज्युनियर गटातून भूमिका सुनिल महाजन (रावेर), शालेय गटातून प्रितेश ईश्वर सोनवणे (जामनेर) तर उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार सत्यनारायण राहुल पवार (जळगाव) यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट भेट देवून गौरविण्यात आले अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी डॉ.नारायण खडके यांनी सदर पुरस्कार हे नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून जिल्ह्यात ॲथलेटिक्स खेळासाठी पोषक निर्मितीसाठी उपयुक्त असे आहे असे विचार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांची महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्य सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्याचा खेळाडू कियारसिंग मुवाशा बारेला याने पोल व्हॉल्ट (बांबूउडी) क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह व ट्रॅकसूट भेट देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक विकास पाटील, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक सचिन महाजन, मुख्याध्यापिका कांचन नारखेडे यांचेसह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील सचिव प्रा.हरीश शेळके जिल्ह्यातील सर्व तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी खेळाडू ,पालक व क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव प्रविण पाटील यांनी केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *