भारतीय जनता पार्टी (भा.ज.पा.) भुसावळ शहराच्या वतीने राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज संत गाडगेबाबा महाराज रूग्णालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन करण्यात आले आणि रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात भाजपा जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, रूग्णालयातील प्रमुख डॉ. फलटणकर मॅडम, डॉ. तौसीफसर, डॉ. संदीपसर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल वसंत तायडे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, राजू चंदन, गोपीसिंग राजपूत,आणि विविध डॉक्टर्स, नर्सेस तसेच रूग्णालय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी, भाजपाच्या पदाधिकार्यांनी संत गाडगेबाबांच्या शिकवणीला पुढे नेत समाजातील गरजू लोकांसाठी आपल्या कर्तव्यातून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.



Leave a Reply