आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अद्वैतानंद योग अॅण्ड फिटनेस स्टुडिओ, भुसावळ येथे विविध योग साधकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील योगप्रेमींनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. यानंतर प्रात्यक्षिक सादरीकरण, श्वसन क्रिया, ध्यान व विविध योग प्रकारांवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या योग साधकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा .डॉ. सीमा पाटील यांनी उपस्थितांना योगाचे मानसिक व शारीरिक लाभ स्पष्ट केले. “योग ही केवळ एक व्यायामपद्धती नसून ती जीवन जगण्याची holistic शैली आहे. नियमित योगामुळे आरोग्य सुधारतेच, पण मनःशांती व आत्मनियंत्रणही मिळते,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या योग साधकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल्या .कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अद्वैतानंद स्टुडिओच्या टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply