महाराष्ट्रात वीजदरात कपात होणार; घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा!

राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्र शासनाने वीजदरात तब्बल १० टक्क्यांनी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हा नवा दर १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात लक्षणीय बचत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने महावितरणच्या नव्या दर प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

कोणाला होणार फायदा?

महिन्याला १०० युनिटांपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना थेट १०% सूट मिळणार आहे.

औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही टप्प्याटप्प्याने दर कपातीचा लाभ मिळणार आहे.

पाच वर्षात एकूण २६% कपात होणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.

सौरऊर्जा आणि स्मार्ट मीटरचा लाभ: सरकारने स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या वेळेत वीज वापरल्यास अतिरिक्त सवलत मिळणार असल्याचेही जाहीर केले. यामुळे सौरऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.

शेतकऱ्यांसाठी खास: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली जाणार असून, प्रति युनिट दर सुमारे ₹३ इतका कमी असेल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *