अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) शाखा भुसावळ ने महिलांसाठी भव्य मशाल यात्रा आयोजित केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना जागरूक करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची महती समाजात पोहोचवणे हा होता. यात्रा अष्टभुजा माता मंदिर,येथून सुरू झाली लक्ष्मी चौक मार्गे आणि शिव स्मारक येथे समारोप झाला. यावेळी शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून रजनी ताई सावकारे, संगीताताई बियाणी, आणि अभाविप प्रदेश मंत्री वैभविताई ढीवरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी शहर मंत्री वैष्णवी कोळी यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आजच्या समाजात दिशा आणि प्रेरणा दिली आहे. महिलांनी या विचारांचा अंगीकार करून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा.”


Leave a Reply