“देव तारी त्याला कोण मारी” या उक्तीप्रमाणे शहरात दोन दिवसांपासून कचराकुंडीत गंभीर जखमी अवस्थेत बेवारस पडलेल्या वासराला नवजीवन मिळाले आहे. ही घटना शिवआज्ञा प्रतिष्ठान व गोसेवक परिवाराच्या तात्काळ मदतीमुळे शक्य झाली.
रात्री खाजगी काम आटपून घरी परतत असताना वरणगाव रोडवरील भोळे पेट्रोल पंपासमोर कचराच्या ढिगात एक वासरू गंभीर जखमी अवस्थेत अभय नरवाडे व धीरज साबळे यांना आढळले. त्यांनी तत्काळ गोरक्षक रोहित महाले यांच्याशी संपर्क केला.
दुसऱ्या दिवशी गोरक्षकांच्या संयुक्त प्रयत्नाने व जळगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर बोरखेडे यांच्या सहकार्याने वासराचा सडलेला पाय शस्त्रक्रियेद्वारे विभक्त करण्यात आला. त्यामुळे त्याला नवे जीवन मिळाले.
या पवित्र कार्यात डॉ. बोरखेडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. अभय नरवाडे, धीरज साबळे, बल्लु धायडे, कुणाल शिंदे, ऋषिकेश बाळापुरे, उमंग सुतार, रोहित महाले, दर्शन वरणकर, निखिल जैन, यश नरवाडे, राजू पांडे, प्रथमेश पल्लाजी, सौरव यादव, नितीन यादव यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शहरातील नागरिकांना आवाहन करताना, रोहित महाले यांनी सांगितले की, “आपल्या परिसरात जर एखादी जखमी गोमाता किंवा मुक प्राणी दिसला, तर गोसेवक परिवाराशी त्वरित संपर्क साधावा.”

Leave a Reply