राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ वतिने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती तसेच विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त संयुक्त जयंती उत्सव सोहळा कार्यक्रमाचे १२ वे वर्ष व अवनी दत्तक योजना शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाचे ४ थे वर्ष

राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ संचालित ” अवनी दत्तक योजना” शैक्षणिक उपक्रम अंतर्गत बहुजन समाजातील ज्यांचे आई वडील नाही असे व ज्यांचे आई वडिल हातमजुरी काम करतात अशा कुटुंबातील ई.५ वी ते ई.१० मध्ये शिक्षण घेत असलेल्या बहुजन समाजातील गोरगरिब, होतकरु,गरजु ४० विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वितरण तसेच पोक्सो कायदा बद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम दि. १६/६/१०२५ रोजी मोठा हनुमान मंदिर साकरी ता.भुसावळ येथे दुपारी २ वाजता घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद सोनवणे सरपंच साकरी असुन प्रमुख पाहुणे , दिलीप फालक माजी उपसरपंच , रतनसिंग बोदर पोलीस पाटील साकरी, नितिन इंगळे ग्रा.पं.सदस्य, मोहन पाटील ग्रा.पं.सदस्य, नारायण कोळी अध्यक्ष आदिवासी कोळी समाज वधु वर सूचक महा.राज्य, संजयसिंग चौधरी समाजसेवक तसेच पोक्सो कायदा मार्गदर्शन ॲड प्रिया अडकमोल उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आले व मंदिरातील देवस्थानी फुलहार अर्पण करून पुजा करण्यात आली दरम्यान सुत्रसंचलन नारायण कोळी यांनी केले दरम्यान उपस्थित मान्यवरांना फाउंडेशन तर्फे पेन भेट देऊन स्वागत करण्यात आले व निर्मला ट्रेनिंग सेंटर च्या सौ.निर्मला कोळी यांनी फाउंडेशन च्या अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांना सोबत असलेला फोटो भेट देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी करतांना दरम्यान फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असलेल्या बद्दल माहिती दिली तसेच फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमी गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करतो सदर फाउंडेशन २०१४ पासुन सामाजिक उपक्रम राबवित असून मागिल अनुभव पाहता अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम ३ जानेवारी २०२० रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सन्मानार्थ सदर योजनेचा शुभारंभ भुसावळ येथे करण्यात आला आहे तसेच दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशन च्या वितीने अभिवादन कार्यक्रम राबविण्यात येतो व सदर अभिवादन कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच नागरिकांना आमंत्रित करण्यात येते व येतांना अभिवादन स्वरुपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात येत असल्या बद्दल माहिती दिली.

अवनी दत्तक योजनेचा उद्देश:- तळागाळातील गरजवंत होतकरु विद्यार्थ्यांनी यांना शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी तसेच कोणीही शिक्षणा पासुन वंचित नसावे त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हे आहे महामानवांच्या विचारांचा आदर्श ठेवून सदर उपक्रम राबविण्यात येत असून नेहमी २० मुलींना साहित्य वितरण करण्यात यायचे परंतु यावर्षी सदर योजनेत बदल करून २० मुलांनाही सहभागी करण्यात आले आहे व आज रोजी गरजवंत ४० विद्यार्थीना जे साहित्य आज वितरण करण्यात येणार हे जमा झालेले साहित्य आहे व पुढेही अशाच नियोजनाची आम्ही शैक्षणिक साहित्य देऊन पुढेही आपल्या जिल्ह्यात गरजवंत विद्यार्थ्यांनीना अवनी दत्तक योजना माध्यमातून मदत करणार आहोत सदर कार्यक्रम या नेहमी एप्रिल महिन्यात घेण्यात येत असतो परंतु यावर्षी आम्ही ठरवले कि शाळा सुरू झालेवरच सदर कार्यक्रम नियोजन करणार येथुन पुढे नेहमी अशाच पध्दतीने कार्यक्रम होणार सांगितले व मागील वर्षात भुसावळ तालुक्यातील शिंदी गाव, कंडारी गाव, ओझरखेडा गाव याठिकाणी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम जरी आम्ही राबवत आहोत यात भुसावळ मधिल आपल्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा खारीचा वाटा आहे यातील श्रेय मदत करणा-या सर्व बांधवांचे आहे जे आमच्या फाउंडेशन च्या कार्यावर विश्वास ठेवून आम्हाला मदत करतात अशीच मदत आमच्या फाउंडेशन ला मिळावी जेणेकरुन गरजवंताना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल याबद्दल सांगितले व महात्मा ज्योतिबा फुले व प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर पोक्सो कायद्या विषयी मार्गदर्शन करतांना ॲड प्रिया अडकमोल यांनी मार्गदर्शन करतांना Protection of children from sexually offence 2012 हा कायदा भारत सरकारने लहान म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांसाठी आणला आणि त्याच्यामुळे 2015 पासून सुरुवात करण्यात आली.

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार वाढल्यामुळे आज भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि 80 ते 90% लोक हे त्यांच्या ओळखीचे लोक असतात ते घरातील , शाळेतील, गार्डन मधील, घराशेजारील, ओळखीचे काका ओळखीचे दादा ओळखीचे आजोबा हे वयस्कर व्यक्ती असतात त्याच्यामुळे आज आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे जर तुमच्या मुलांवर अन्याय झाला असेल तर तुम्ही नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला हवी , अत्याचार हा मुलींवरच नाही तर मुलांवर सुद्धा होतो यामुळे मुलं मानसिक स्थिती बदलत होते आणि ते चिडचिड करू लागतात लोकांपासून लांब राहतात समोरच्या व्यक्तीला घाबरतात अचानक झोपेत घाबरणे उठून बसणे रडणे कमी जेवण करणे सारखी चिडचिड करणे या गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे शाळेतील लोकांनी सुद्धा मुलं काय करता किंवा काही नाही करत याकडे लक्ष दिले पाहिजे कारण की शिक्षक हे मुलांच्या जवळचे व्यक्ती असतात त्याचप्रमाणे जर मुलांवर अन्याय झाला असेल तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी कडे तपासणी केली जाते जर मुलगी असेल तर महिला वैद्यकीय अधिकारी असते तिचं सगळ्या प्रकारचे चाचणी होते तिची एचआईवी चाचणी होते त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा ती ला गर्भधारणा झाली आहे की नाही या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात त्याचप्रमाणे मुलांचे जबाब घेतले जातात मुलाचे जबाब हे विनावर्तीचे पोलीस त्यांच्या घरी जाऊन घेऊ शकतात तो जबाब मुलं त्यांच्या भाषेत जर ते ग्रामीण भाषेत असेल तरीसुद्धा ज्या भाषेत असेल ते जबाब नोंदवला जातो 90 दिवसाच्या आत चार शीट पोलिसांनी कोर्टात दाखल केली पाहिजे कोर्टात मॅटर चालत असताना ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्याला सरकारी वकील व एनजीओ हे सगळे लोक त्याला मदत करतात मॅटर हे जे जे न्यायालयात सुरू असतं मुलाचे डॉक्टरांना कौन्सलिंग केली जाते जेणेकरून मूल त्या अत्याचारापासून बाहेर आले पाहिजे पालकांनो अशी चूक करू नका मुलांना त्या शाळेतून काढू नका किंवा त्यांच्या शिक्षण बंद करू नका किंवा समाजापासून तोडू नका कारण की ते अजूनच मानसिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते आरोपीला जामीन होत नाही कारण हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे याच्यामध्ये लवकर बेल होणे शक्य नाही मुलाच्या भविष्यासाठी सरकार त्यांना त्यांचा भविष्य पूर्ण उभारण्यासाठी निधी मिळत असते त्याचप्रमाणे मुलगी ही सोळा वर्षाखालील असेल तर वीस वर्षापर्यंत करावास व दंड होतो मूल जर बारा वर्षा आतील असेल तर आजन्म करावाच किंवा मृत्यू दंड होतो याविषयी सांगितले. उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन तर्फे गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जाते हा उपक्रम खुप चांगला राबविण्यात येत असुन असेच चांगले कार्य फाउंडेशन माध्यमातून व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या व यापुढे काही मदत लागल्यास सांगा होईल ती मदत आम्ही पण करू सांगितले असे बोलून मनोगत व्येक्त केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विनोद सोनवणे सरपंच यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांची हि खरी जयंती साजरी होत असुन फाउंडेशन च्या माध्यमातून अवनी दत्तक योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा शैक्षणिक उपक्रम खरोखर महापुरुषांच्या कार्याचा विचारांना व अभिप्रित असा हा समाजपयोगी उपक्रम असून अशीच जयंती साजरी व्हायला हवी जेणेकरून शिक्षणा पासुन कोणी वंचित राहणार नाही यापुढेही फाउंडेशन ने असेच चांगले उपक्रम राबवावेत असे बोलून उपस्थितांना महात्मा ज्योतिबा फुले व प.पु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन समाजातील ४० विद्यार्थ्यांना १ शाळेची बॅग, १२ वह्या-रजिस्टर २०० पेजस, १ कंपास साहित्यानी भरलेली, १ लेटरपॅड, ४ पेन, प्रत्येकी एका विद्यार्थीनीला १२ हातरूमाल, १ कलसबाॅक्स ई. शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद सोनवणे सरपंच यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांची हि खरी जयंती साजरी झाली असे सांगुन कार्यकम आयोजकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे शेवटी आभार नारायण कोळी यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य फाउंडेशन च्या सचिव निर्मला सुरवाडे, माधुरी सपकाळे,रेखा खरात आदी महिला तसेच जय बजरंग गृप साकरी सर्व पदाधिकारी, निर्मला ट्रेनिंग सेंटर यांनी केले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *