एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा नगर, भुसावळ या शाळेत दिनांक .21/06/2025 रोजी सकाळी ठिक 7.30 वाजता शाळेच्या आवारात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख म्हणून योगा शिक्षक क्षीरसागर,संस्थेचे सेंक्रेटरी पी.व्ही. पाटील,शाळेच्या, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.
योगा शिक्षक क्षीरसागर यांनी विदयार्थ्यांना ताडासन, वृक्षासन,भद्रासन, अर्घचकासन,वज्रासन,शशांकासन, त्रिकोणासन, भ्रामरी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक केले.सुर्यनमस्काराचे महत्व सांगितले. शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे योगा. यामुळे आपले शरीर शेवटपर्यंत चांगले राहते.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका सहभागी होवुन उत्साहाने त्यांनी योग, प्राणायम, ध्यान केले. आभारप्रदर्शन पुनम भोळे यांनी केले.

Leave a Reply