आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ७ व्या अंतराष्ट्रीय रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड स्पर्धा दिनांक १८जुन २०२५ ते १९ जुन २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये भारत रशिया, थायलंड सह अन्य देशातील स्केटर यांनी सहभाग घेतला होता या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष वयोगटांतील इनलाईन व क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा स्केटर व एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून तो विजयी झाला व त्याला एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड यांच्या वतीने ट्राफी देण्यात.

या निवडीमध्ये त्याचे कोच पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्याला मार्गदर्शन केले एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी झाल्याबद्दल त्याचे केंद्रिय क्रिडा मंत्री रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयभाऊ सावकारे आमदार राजुमामा भोळे खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले तिर्थराज पाटील च्या तळवेल व भुसावळ येथिल घरी आंनदी वातावरण आहे तो त्याचे कोच व वडिलांसह दि २१जून रोजी रात्री १वा भारतात परत येणार आहे व २२ जून रोजी भुसावळ मध्ये येणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *