भुसावळातील गुणवंतांचा एकत्रित गौरव: ‘एक क्षण गौरवाचा’ मा. ना. वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न आईदादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

“आई दादा प्रतिष्ठान” व “भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ” यांच्या संयुक्त विद्यमाने “एक क्षण गौरवाचा 2025” हा विशेष सन्मान सोहळा भुसावळ तालुक्यात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्य, कला, व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय सावकारे यांच्या हस्ते गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

“एक क्षण गौरवाचा 2025” या उपक्रमातून भुसावळ परिसरातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडापटू, साहित्यिक, व समाजसेवक यांचे योगदान ओळखून त्यांना समाजात नवे बळ व प्रोत्साहन देण्याचा उद्देश यशस्वीपणे पूर्ण झाला.

कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक राहुल वसंत तायडे,आयोजक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी प्रेमचंद तायडे,संतोष ठोकळ,रविंद्र दाभाडे,विक्की गोहर, गणेश जाधव,राकेश सपकाळे,दिपक गायकवाड नरेश खंडारे,दिपक सोनवणे,दिनेश बालूरे,आकाश आव्हाड,भरत उमरिया,संजय नरवाडे,रवि घुले,वाल्मिक पवार,अश्विन नरवाडे,अजय तायडे यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *