तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिनाच्या शुभमुहूर्तावर शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे वाद्यपूजन सोहळा हा मातृशक्ती यांच्या हस्ते करण्यात आला
हा सोहळ्या साठी रजनी सावकारे प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष केतकी पाटील संचालक गोदावरी फाउंडेशन तथा भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रश्मी शर्मा इंटेलिजन्स ऑफिसर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संगीता पाटील सहाय्यक कृषी अधिकारी भारती काळे पीएसआय भुसावळ बाजारपेठ राजश्री कोलते द वर्ल्ड स्कुल संचालक मंगला पाटील सकल लेवा समाज महिला अध्यक्ष तेजल भंगाळे ज्येष्ठ वादक शिवमुद्रा ढोल पथक काव्या पाटील कवी व दुर्गावाहिनी तसेच हिंदू साम्राज्य व छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दत्त गिरणारे स्वामी ब्रह्मानंद स्वामी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रवींद्र ढगे शिवजयंती 2025 चे उपाध्यक्ष मुकेश गुंजाळ संतोषी माता को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव इंगळे डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी पाच नद्यांचे पाणी तसेच पंचामृत दुग्धभिषेक केला गणपती जगदंबा व छत्रपती शिवाजी महाराजांचे आरती करण्यात आली
त्यानंतर वादकांनी वादन करून आकर्षण निर्माण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री विनोद उबाळे यांनी केले आभार प्रदर्शन वरून इंगळे यांनी केले या कार्यक्रमासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र गीताने करण्यात आला.

Leave a Reply