दिनांक ८ जून २०२५ रोजी रात्रीपासून ९ जूनच्या पहाटे दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील मुसाफिरखान्यात झोपलेल्या प्रवाशाची सॅक बॅग, ओपो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी दिलारपूर, बिहार येथील बुध नारायण रामू साहनी (वय ३१) यांनी फिर्याद दिली.फिर्यादी हे जळगावहून ऑटो रिक्षाद्वारे भुसावळ रेल्वे स्थानकात आले होते. पहाटे ४ वाजता दानापुरकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी त्यांनी मुसाफिरखान्यात खांबाजवळील चौकोनी ओट्यावर झोप घेतली होती.
त्यावेळी त्यांच्याजवळ असलेली निळ्या रंगाची सॅकबॅग व डाव्या खिशातील मोबाईल व ३००० रूपये रोख चोरीस गेले.गुन्हा दाखल झाल्यानंतर, लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत, गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.संदीप पुरुषोत्तम कांबळे (वय १९), गार्ड लाईन, भुसावळशेख इब्राहिम शेख नुरबेग (वय ३०), मिल्लत नगर, भुसावळत्यांच्याकडून चोरी गेलेला ओपो कंपनीचा ग्रीन-सिल्वर रंगाचा मोबाईल (किंमत ₹३९,९९९/-) जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींची १३ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली असून, आणखी माल हस्तगत व इतर आरोपींचा तपास सुरू आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक स्वाती भोर (लोहमार्ग, छ. संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संजय लोहकरे, निरीक्षक सुधीर धायरकर व आरपीएफ निरीक्षक पांचुराम मीना यांच्या सहकार्याने पार पडली.तपास अधिकारी म्हणुन पोहवा संजय निकम आणि गुन्हे प्रगटीकरण शाखा, लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ यांनी काम पाहिले.

Leave a Reply