मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘नन्हे फरिश्ते’ या अभियानाअंतर्गत एक नाबालिग मुलगी सुरक्षितपणे बालकल्याण समितीकडे सुपूर्त केली.आज दिनांक ०८.०६.२०२५ रोजी ट्रेन क्र. १२५३३ पुष्पक एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले टीटीई श्री. के. के. मालपाणि यांना कोच S/4 मध्ये एक संशयास्पद नाबालिग मुलगी खंडवा स्टेशनपासून दिसून आली. चौकशी केली असता मुलीने समाधानकारक उत्तर दिले नाही व तिने कोणतीही तिकीट अथवा पास घेतले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर टीटीई महोदयांनी भुसावळ स्टेशनवर पोहोचल्यावर मुलीला आरपीएफ पोस्टवर आणले. सीसीटीव्ही देखरेखीखाली एएसआय श्री. एस. जे. दुबे व महिला प्रधान आरक्षक एस. एम. वांदे यांनी तिची विचारपूस केली. तिचे नाव अंशिका कुमारी गंगाराम निषाद, वय १७ वर्षे, राहणार – महुईया, जिल्हा इलाहाबाद असे असल्याचे तिने सांगितले.
तपासात मुलगी घरात कोणालाही न सांगता निघाली असून ती तिच्या नातेवाईकांकडे जात होती, असे स्पष्ट झाले. तिच्याकडे पालकांचा संपर्क क्रमांकही नव्हता. यानंतर तिची ट्रॉमा केअर, भुसावळ येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत संपूर्ण कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून मुलीला बालकल्याण समिती, जळगाव यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले.
रेल्वे व आरपीएफने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही अत्यंत प्रशंसनीय आहे.

Leave a Reply