मध्य रेल्वे, मुंबईचे महानिरीक्षक व प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त श्री सुरेंद्र नाथ चौधरी यांनी भुसावळ येथे वार्षिक सुरक्षा निरीक्षणासाठी भेट दिली. त्यांच्या आगमनप्रसंगी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मंडल रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.या निमित्ताने खंडवा येथील नव्याने बांधलेल्या आरपीएफ जवानांच्या बैरक व शेगाव येथील नविन पोस्ट भवनाचे उद्घाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.निरीक्षणादरम्यान, विभागीय अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षा व्यवस्थेसंबंधी समन्वय बैठक घेण्यात आली. यामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.भुसावळ येथील रिझर्व लाईनवर आरपीएफ जवानांबरोबर सुरक्षा संमेलन घेण्यात आले. यावेळी श्री चौधरी यांनी राष्ट्रनिर्माणातील आरपीएफच्या योगदानाची प्रशंसा केली आणि सेवा, समर्पण व शिस्तबद्धतेने कार्य करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमात वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त श्री चित्रेश जोशी, सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ, सहाय्यक सुरक्षा आयुक्त मनमाड, तसेच भुसावळ मंडलातील सर्व आरपीएफ निरीक्षक उपस्थित होते.
महानिरीक्षक सुरेंद्र नाथ चौधरी यांचे भुसावळमध्ये वार्षिक सुरक्षा निरीक्षण आरपीएफ जवानांना मार्गदर्शन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Leave a Reply