‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत रेल्वे तिकिट दलालाला भुसावळ स्टेशनवर रंगेहात पकडले

रेल्वे पोलिसांनी (RPF) ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत आज भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट दलाली करत असलेला मोहम्मद युसुफ खाटिक या व्यक्तीस रंगेहात पकडले.त्याच्याकडे २१ मे २०२५ च्या सचखंड एक्सप्रेसचे स्लीपर तिकीट आणि रिकामे आरक्षण पत्रक मिळाले. चौकशीदरम्यान त्याने तिकीटाच्या मूळ किमतीव्यतिरिक्त २०० रुपये रोख दलाली घेतल्याचे मान्य केले.

अवैधरित्या प्रवाशांचे तिकीट बुक करणारा मोहम्मद युसुफ खाटिक याच्याकडे कोणतेही एजंट परवाना नसल्याचे चौकशीत उघड झाले. RPF ने त्याच्याकडून संपूर्ण पुरावे जप्त केले आहेत. तपासाअंती आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी करत आहेत.

रेल्वे तिकीट दलालांनी प्रवाशांना मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे आकारून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत भुसावळ स्थानकावर केलेली अटकेची कारवाई ही या दलाल प्रवृत्तींना चपराक ठरत आहे.

रेल्वे प्रशासनाची स्पष्ट सूचना – ‘फक्त IRCTC अधिकृत मार्गानेच तिकीट बुक करा

’या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, फक्त अधिकृत IRCTC पोर्टल, मोबाईल अ‍ॅप किंवा अधिकृत एजंटांमार्फतच तिकीट बुक करावे. अनधिकृत व्यक्तींशी व्यवहार केल्यास आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *