भुसावळ (प्रतिनिधी):भारतीय सैन्याची शक्ती आणि मातृशक्तीचा संगम ‘ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’च्या रूपाने भुसावळ मध्ये साकार होणार आहे. २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवत अष्टभुजा माता मंदिर येथून शौर्य यात्रेला सुरुवात होईल आणि समारोप मरीमाता मंदिर, सातारापर्यंत होईल.या यात्रेमध्ये भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलातील विंग कमांडर वेमिका सिंग यांच्या दुर्गारुपी शौर्याचा सन्मान केला जाणार आहे. दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने आयोजित या यात्रेत शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत
ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’च्या निमित्ताने मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीच्या सर्व सदस्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.या शौर्य यात्रेचा उद्देश केवळ सैनिकी शौर्याला सलाम करणे नसून, भारतीय स्त्रीशक्तीची एकजूट, जागरूकता आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवणे हा देखील आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या जवानांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक महिलेला या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे.”आपली उपस्थिती म्हणजे वीर जवानांना एक नमन, आणि भावी पिढीला एक प्रेरणा!” अशा शब्दांत दुर्गा वाहिनीच्या नेतृत्त्वाकडून भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply