पहलगाम येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री १:४४ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
हल्ल्याची ठिकाणे:
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील: बहावलपूर, अहमदपूर, मुरीदके
पाकव्याप्त जम्मू व काश्मीरमधील: बाग, मुझफ्फराबाद, कोटली
संरक्षण मंत्रालयाचे निवेदन:हे हल्ले केंद्रित, तोलूनमोलून केलेले आणि प्रक्षोभक नसलेले होते.कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी ठिकाणावर हल्ला केला नाही.
लष्कराचे वक्तव्य:भारतीय लष्कराने ट्विटरवर लिहिले – “न्याय झाला आहे. जय हिंद!”तसेच, लष्कराने एक संदेश पोस्ट केला: “प्रहाराय सन्निहिताः, ज्याय प्रशिक्षिता” – अर्थात “हल्ला करण्यास तत्पर, विजयाच्या प्रतिक्षेत.”सीमावर्ती तयारी:भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारत-पाक सीमा भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स अलर्ट अवस्थेत आहेत.पाकिस्तानची प्रतिक्रिया:पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे, मात्र त्याची तपशीलवार प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.भारताने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल आणि देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई करण्यास भारत मागे हटणार नाही.

Leave a Reply