भाजपच्या शहराध्यक्ष निवडीचा काउंटडाऊन सुरू; कुणाच्या नशिबी माळ?

भुसावळ शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आता काउंटडाऊन सुरू झाला आहे. प्रदेश कार्यालयाकडून २४ ते ४८ तासांत अधिकृत नाव जाहीर होईल, अशी माहिती मिळते आहे.
या पदासाठी दावेदारांची संख्या वाढत असली तरी पक्ष नव्या चेहऱ्यांकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पसरली आहे.भुसावळ भाजप अध्यक्ष पदासाठी वरिष्ठ स्तरावर अंतिम फेरफार सुरू असून, लवकरच नाव जाहीर होणार आहे. नवीन नेतृत्वासाठी पक्ष नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवेल का, की पुन्हा एकदा अनुभवी नगरसेवकांवर भर देईल, हा मोठा प्रश्न आहे.नाव सुचवण्यासाठी स्थानिक पातळीवरून अहवाल पाठवले गेले असून, त्यात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व संघटनामधील योगदानाचाही विचार केला गेला आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा उमेदवार पुढे येतो, यावरून शहरातील भाजपची पुढची दिशा ठरणार आहे.

किरण कोलते, संदीप सुरवाडे, राहुल तायडे व श्रेयस इंगळे ही नावं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही इच्छुकांची वरिष्ठांशी थेट बैठक झाली असल्याचेही समजते. या पदासाठी स्थानिक व प्रदेशस्तरावरील मतांचा समन्वय साधणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकर्त्यांची एकजूट ठेवणे, आगामी नगरपालिका निवडणूक तयारी आणि स्थानिक गटबाजी दूर ठेवण्यासाठी युवराज लोणारी यांचा सुद्धा पुन्हा शहराध्यक्ष म्हणून विचार होऊ शकतो अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *