दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे हे आहेत फायदे…नक्की वाचा !

दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याचे अनेक फायदे आहेत. या सवयीमुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतात. तसेच हृदयविकाराचा झटका, मधुमेह यासह अनेक आजारांपासूनही बचाव होतो.

*हृदयविकाराचा झटका –

दातांना किड लागण्यास सुरुवात होताच शरीरात सी-रिअँक्टिव्ह प्रथिने आणि फायब्रिनोजेनची पातळी वाढू लागते. या घटकांमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच किडलेले दात ताबडतोब काढण्याचा सल्ला न्यूयॉर्क विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देतात. एवढेच नव्हे तर दातांमध्ये असलेले जिवाणू रक्तात मिसळून संसर्ग पसरवतात.

*फुप्फुसांचा आजार –
क्रॉनिक ऑब्सट्रेक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आणि दातांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीरिओडोंटोलॉजीच्या मते, तोंडातील जिवाणू फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत संसर्ग पसरवतात. यामुळे सीओपीडी असलेल्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. सिगारेटदेखील या आजाराचे एक प्रमुख कारण मानले जाते.

*मधुमेह –*

न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधकांना मधुमेह असलेल्यांमध्ये हिरड्यांशी संबंधित आजार असण्याची तिप्पट शक्यता असल्याचे आढळून आले. तसेच मधुमेहींची ग्लुकोजची पातळी नियंत्रित राखण्याची क्षमता कमी होते. सोबतच हृदय आणि मूत्रपिंडाचा आजार होण्याची भीती असते.

*संधिवात –*

हिरड्यांशी संबंधित आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या दातांशी जुळलेली हाडे कमकुवत होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते, काही रुग्णांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा हा संकेत असू शकतो. काही काळानंतर ते संधिवाताचे कारण बनते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *