भुसावळ येथील बस स्थानकावर नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर व प्रवाशांच्या सोयीसाठी शासनामार्फत भुसावळ आगाराला या नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या नवीन बससेवेमुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत आणि आरामदायक होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण होणार आहे.
या प्रसंगी प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तसेच अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
जाहिरात 👇


Leave a Reply