भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवदत्त नगर,भुसावळ येथील बुद्धिष्ट सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजातील अनेक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय संविधान भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज लोणारी,मा.नगरसेवक हे होतेप्रमुख उपस्थितीत बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ, प्रभागाचे मा.नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे भाजपचे अनुसुचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंतदादा तायडे यांचा सन्मान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष बी.वाय.सोनवणे सर यांनी प्रास्ताविक संबोधित केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले.यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष भगवान बागुल,सचिव राजीव कापडणे तसेच सर्व सह पदाधिकारी सदस्य यांनी प्रयत्न केले.
अध्यक्षीय भाषणात युवराज लोणारी यांनी “संविधान घराघरात पोहोचवण्याचा” उपक्रम म्हणजेच समाजप्रबोधनाचे शक्तिशाली माध्यम असल्याचे सांगून सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले, आणि एक चांगला उपक्रम संस्थेच्या माध्यमातून झाला याबद्दल त्यांचे कौतुक केले.


Leave a Reply