अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि अनिरुद्ध आदेश पृथक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर एकूण १३४ ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सद्गुगुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भुसावळ येथील उपासना केंद्रा मार्फत अशाच प्रकारचे शिबीर ब्राह्मण संघ येथे आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये एकूण ८० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यापैकी 60 जणांनी उत्साहाने रक्तदान केले. भक्ती आणि सेवेला जोडणारा हा उपक्रम दरवर्षी भुसावळमध्ये राबवला जात असून स्थानिक नागरिकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात 👇



Leave a Reply