पित्ताचा त्रास,आंबट ढेकर या उपायाने कमी करा._* उत्तम पचनासाठी पित्ताची लेव्हल योग्य असणे गरजेचे असते. पण जर पित्त वाढले तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. पित्त हे लिव्हर मध्ये तयार होते आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होते. येथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडले जाते. आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा तरी उलट्या होतात. प्रत्येक आठवड्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी वैताग येतो. विविध औषधे केली तरी तात्पुरता आराम मिळतो आणि मग पुन्हा जैसे थे. पित्ताचा त्रास त्यांना होतो ज्यांच्या शरीरात उष्णता फार जास्त असते. उष्णतेमुळे पित्तामध्ये वाढ होते आणि मग ते पित्त उलटून पडते. जर ते बाहेर निघाले नाही तर, मग डोके प्रचंड दुखायला लागते. पित्त शांत होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो. काही घरगुती उपायांनी पित्त शांत करता येते.

◼️आम्ल पित्त :-_काहीही खाल्यावर जळजळणे किंवा आंबट ढेकर येणे. तसेच छातीत सारखे दुखणे आणि श्वास घेताना त्रास होणे ही हायपर अॅसिडीटीची लक्षणे आहेत. त्याला आयुर्वेदामध्ये आम्ल पित्त असे म्हटले जाते. असा त्रास सारखा झाल्याने मग उलट्या होतात.
या आम्ल पित्ताच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय करा.
🫸शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही तांदळाचे वा भाताचे पाणी प्य्याला हवे.यामुळे शरीरात थंडावा वाढतो. जर तुम्हाला पित्ताची लक्षणे दिसत असतील आणि तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही नियमितपणे तांदळाचे पाणी प्यायला हवे.
🫸रोज रात्री झोपण्याआधी चमचाभर धने पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. धने पित्तशामक असतात.
🫸 जेवणानंतर बडीशेप खा. बडीशेप पचनासाठी फार चांगली असते. तसेच पोटाला थंडावा देते. बडीशेप आणि खडीसाखर खाल्याने पित्तावर नियंत्रण ठेवता येते. जेवणानंतर हे मिश्रण खात जा. किंवा एक कप पाण्यात काही बडीशेप घेऊन ती उकळवा आणि त्याचा काढा प्या. बडीशेपमध्ये तेल असते जे पचनाला मदत करते
🫸आम्ल पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मस्त उपाय म्हणजे गुलकंद खाणे. गुलकंद थंड असतो. गुलकंद हा पित्तशामकही असतो. चमचाभर गुलकंदही पुरेसा आहे.
🫸नारळ पाणी पिणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. तसेच लिंबू पाणीही पिऊ शकता

Leave a Reply