रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा हनुमान चालीसा पठण, हवन,सुंदर कांड यांचे नियोजन

वरणगाव- ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी वरणगाव याठिकाणी वासुदेव परिवार तर्फे विविध उपक्रमांनी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 3 वाजता गणेश आराधना,प्रभु श्री राम स्तुती नंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे पठण सोबत हवन करण्यात आले.यावेळी प्रत्येकी 11 असे हनुमान चालीसाचे एकूण 506 सामूहिक संगीतमय पाठ करण्यात आले.महाराज रामनानंदजी जयस्वाल यांच्या समूहाद्वारे “सुंदरकांड पाठ’ करण्यात आला. त्यांच्या सोबत संगीतकार आनंद कुमार,राजेश धुर्वे, कुणाल शिंदे,बुधाजी महाराज उपस्थित होते.,यावेळी तुकाराम पाटील,वैशाली पाटील,पियुष महाजन, डॉ. अनिल शिंदे,डॉ. रवींद्र माळी,विवेक पाटील,सुलोचना पाटील,डॉ. रेणुका पाटील, गजानन नाथजोगी, कपिल राणे, प्रीती महाजन, रुपाली महाजन,दीपक फेगडे, मनोज गोसावी,उमेश माळी,पार्थ महाजन, कमलेश येवले,कुणाल शिंदे,डॉ. विशाखा बेंडाळे ,ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत बढे, दिनकर पाटील,प्रकाश पाटील, रामा शेटे,रत्ना पाटील,सुनीता चौधरी,माधुरी फेगडे,चैताली फेगडे,किशोर मिश्रा,मीना मिश्रा,उषा राणे,चेतन झोपे,आकाश भंगाळे,सारंग जोशी,संजय महाजनआदी आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते.शेवटी प्रसाद भोजन झाल्यावर आभार प्रदर्शन दीपक फेगडे यांनी मानले.

राम सेतू दगडाचे विशेष आकर्षण… दिपक फेगडे

हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत आलेल्या भाविकांसाठी प्रभु श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राम सेतू दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.7 हजार वर्षापूर्वी घडलेल्या रामायणातील राम सेतू दगड अजूनही पाण्यात तरंगत असून भाविकांसाठी हा हनुमान जन्मोत्सव कायम स्मरणात राहणार आहे.दिपक फेगडे,सदस्य, वासुदेव परिवार,वरणगाव

भाविकांचा वाढता उत्साह संजीवनीसारखा:- पियुष महाजन

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुरू केलेले संगीतमय हनुमान चालीसा पठणासाठी भाविकांची संख्या वाढत असून,आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.भाविकांचा वाढता उत्साह आम्हाला संजीवनी सारखा आहे.आगामी काळात व्यापक नियोजन करू.पियुष महाजन,सदस्य, वासुदेव परिवार,वरणगाव

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *