रामनवमीच्या शुभमुहूर्तावर केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जामनेर रोड , भुसावळ येथील श्रीसाईबाबा मंदिरात आयोजित पालखी सोहळ्यात सहभाग घेत प्रभु श्रीरामजींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरासमोरील गोसेवा केंद्राला भेट दिली.
या गोसेवा केंद्रात कत्तलीपासून वाचवलेल्या व जखमी गोमातांची व इतर मुक्या जीवांची उत्कृष्ट सेवा होत असल्याचे पाहून ताईंनी समाधान व्यक्त केले. गोभक्त श्री मुन्नाभाऊ बेहऱांनी माहिती दिली की हे कार्य पूर्णपणे निस्वार्थ भावनेने सुरू आहे.
गोभक्त योगेश पाटील यांनी जखमी गोमातेच्या उपचारासाठी खासगी जागा दिली आहे. ताईंनी सांगितले की, भविष्यात या पवित्र कार्यासाठी संस्था स्थापन करून मुक्या जीवांसाठी एक अद्ययावत दवाखाना उघडण्याचे स्वप्न साकार करावे.
या वेळी साईसेवक पिंटुभाऊ कोठारी, विनोदभाऊ चोरडिया, हर्षल सपकाळे, अनिरुद्ध कुलकर्णी, रोहित महाले आणि अनेक गोसेवक उपस्थित होते.
रक्षाताईंनी केंद्राच्या व्यवस्थापक श्री रोहित महालेंना विचारले की, ही संस्था अधिकृत आहे का. यावर त्यांनी आर्थिक मर्यादेमुळे संस्था नाही असे सांगितले. तरीदेखील, तीन वर्षांपासून पादत्राणे न घालता गोरक्षणासाठी झटत आहेत, हे ऐकून ताईंनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
जाहिरात👇



Leave a Reply