भुसावळ शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव २०२५ निमित्ताने समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने चार दिवसांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला चालना देणाऱ्या या उत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
२७ एप्रिल २०२५ रोजी उत्सवाची सुरुवात रक्तदान शिबिराने होणार आहे. सकाळी ९ वाजता ब्राह्मण संघ, न्यु एरिया वार्ड येथे हे शिबिर पार पडणार असून, आरोग्य विषयक जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता श्री साईबाबा मंदिर, जामनेर रोड येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून, परशुराम जयंतीचा संदेश संपूर्ण शहरात पोहचवण्यात येईल.
२८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता बियानी पब्लिक स्कूल प्रोफेसर कॉलनी येथे “शंभूगाथा” या विषयावर श्री. अभिजीत मुंडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर आधारित हे व्याख्यान तरुण पिढीला इतिहासाची जाण करून देणारे ठरेल.२९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री अष्टभुजा माता मंदिर ते श्रीराम मंदिर, म्युनिसीपल पार्क या मार्गावरून भव्य दिव्य शोभायात्रा पार पडणार आहे. या शोभायात्रेत डोल, लेझीम, पालखी आणि विविध पारंपरिक देखावे सहभागी होणार आहेत.शोभायात्रेनंतर रात्री ८ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या संपूर्ण उत्सवाचे आयोजन परशुराम जन्मोत्सव समिती २०२५ व समस्त ब्राह्मण समाज, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात 👇



Leave a Reply