
भुसावळ, दि. ६ एप्रिल २०२५: पतंजली जेष्ठ नागरिक संघ, भुसावळ तर्फे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयभाऊ सावकारे यांच्याकडे विविध सार्वजनिक व आरोग्यविषयक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत
महादेव मंदिरासमोरील जेष्ठ नागरिक सभागृहाचे विस्तारीकरण व सभामंडपाची मागणी
भुसावळ येथील सर्वे क्रमांक २२२/१ व २२२/२ मधील ओपन जागेतील भिरूड कॉलनीतील महादेव मंदिरासमोरील जेष्ठ नागरिक सभागृहाचे पश्चिम दिशेने विस्तारीकरण करावे, तसेच संपूर्ण बांधकाम व मंदिरावरील सभामंडपाचे काम करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
जेष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एनफ्ल्युएन्झा लसीकरणाची मागणी
उच्चरक्तदाब व मधुमेहग्रस्त जेष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनामार्फत एनफ्ल्युएन्झा लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांना आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ट्रामा सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची मागणी
भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर येथे सोनोग्राफी, टू डी इको, स्ट्रेस टेस्ट, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. आदी यंत्रसामुग्रीसाठी निधी मंजूर करून उपकरणे पुरविण्यात यावीत.
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक व रात्रपाळीसाठी व्यवस्था
ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने नेमणूक करण्यात यावी, तसेच रात्रपाळीसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचर व वाहनचालकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.
आरोग्य सल्लागार समितीत जेष्ठ नागरिक प्रतिनिधींची नेमणूक करावी
भुसावळ ट्रामा सेंटरमधील आरोग्य सल्लागार समितीत जेष्ठ नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.यावर मंत्री संजयजी सावकारे यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ते या संदर्भात ठोस पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

जाहिरात 👇



Leave a Reply