देवभाषा, ज्ञानभाषा किंवा सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा आत्मसात करणं काळाची गरज आहे कारण संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे, संस्कृत भाषेतील उच्चार, व्याकरण परिपूर्ण आहे .प्राचीन साहित्यातले ज्ञान आत्मसात करायचे असेल तर संस्कृत भाषा शिकणे क्रमप्राप्त आहे असे मत डॉ. सौ गौरी खानापूरकर यांनी विद्यार्थिनींना संबोधित करताना सांगितले निमित्त होते अहिल्यादेवी कन्या विद्यालय तर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या विद्यालयातील संस्कृत मंडळातर्फे संस्कृत दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले तदनंतर संस्कृत दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून कथाकथन, एकांकिका, समूहगीत, वैयक्तिक गीत, नाटिका सादर केल्या.
संस्कृत भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत श्लोकांचे उच्चारण करताना प्राणायाम होत असतो.. त्यामुळे आपले आरोग्य ही सुदृढ राहत असते असे मत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक श्री अतुल जाधव सर यांनी आभार प्रदर्शन श्री आशिष निरखे यांनी तर सूत्रसंचालन प्राची चौधरी व कार्तिकी बोंडे या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply