भुसावळ येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रम संस्थेच्या चिटणीस श्रीमती उषाताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तदनंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत ,समूह गीत बँडच्या तालावर सादर करण्यात आले त्यानंतर विद्यार्थिनींनी विविध मनोरे व कवायत सादर केल्या.
नंतर सर्व विद्यार्थिनींनी, पालकांनी शिक्षकांनी तंबाखूमुक्त अभियाना ची शपथ घेतली.. त्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम ,स्वातंत्र्य दिन चिरायू हो वो आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ध्वजारोहण समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply