15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपणास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच अनेक स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी जीवावर उदार होत ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते. ज्यांच्यामुळे आपणास स्वातंत्र्य मिळाले या सर्व स्वातंत्र्यवीरांना सॅल्यूट जय हिंद .
ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशातील साधन खनिज संपत्ती व घनदाट जंगल होते. आपण त्यांचे रक्षण करणे गरजेचे होते परंतु काही कारणास्तव या साधन संपत्ती, खनिज संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जंगल भरपूर प्रमाणात कमी झाले त्यामुळे निसर्गनिर्मित सजीव सृष्टी वरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपला पर्यावरण समतोलावर मोठ्या प्रमाणात आघात होऊन आपल्या देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहेत.
अनेक प्रकारचे जीव घेणारे आजार होत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन गाव शेतं यांच अतोनात नुकसान होत आहे. ठिकठिकाणी चक्रीवादळ होत शेतीचा अतोनात नुकसान होत आहे कमी काळात प्लास्टिकचा वापर करण्याची सवय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचे विघटन होत नसल्यामुळे सर्व जग प्लास्टिक कचऱ्याला कंटाळले आहे.
सर्व प्लॅस्टिक नद्या नाले मध्ये जाऊन तुडंब भरत आहेत रस्त्यावर घाण पाणी वाहते तसेच थेट समुद्रातही हा कचरा जात आहे त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी ही धोक्यात आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे सरकारी गाड्या न वापरता आपल्या खाजगी गाड्या वापरतात गरज नसताना कुठेही जाण्यासाठी गाडी शिवाय जात नाही कार्बन डाय-ऑक्साइड मुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे तसेच ध्वनी प्रदूषण ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कर्कश आवाजामुळे जमीन थरारते शरीरावर अनेक प्रकारचे आजार होत आहेत या सर्व गोष्टीमुळे वातावरणात अमुलाग्र बदल दिसून येत आहे .
पावसाचे प्रमाण कमी होत असून आला तर ढगफुटी सारखा होत असल्यामुळे जमिनीत पाणी जात नाही आहे त्यामुळे पाण्याची लेवल खूप प्रमाणात खाली गेलेली आहे. म्हणून पाण्याचा वापर कमीत कमी करावा लागत आहे. डॉ सुरेंद्र सिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान आपण सर्वजण धरतीमातेचे लेकरू आहोत आपली कृतज्ञता म्हणून आज पर्यंत कळत नकळत जेही चूक झाली असेल तिला माफी मागून आता धरती मातेच्या ऋण फेडण्याची वेळ आहे आपल्या धरती मातेला वाचवूया धरती मातेचे तरी आपण होणार प्रदूषण कमी होण्यासाठी काय करू शकतो याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरण परिवर्तन रॅलीचे आयोजन करणे अत्यावश्यक आहे शालेय स्तरावर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो आणि रॅली काढावी लागली म्हणजे आपल्या देशावर हे मोठे संकट आहे याची चाहूल सर्वांना होईल.व निसर्गाप्रती आदर निर्माण होईल.
जंगल आहे तर सर्व मंगल आहे वन आहे तर जल आहे . जल आहे तर जीवसृष्टी आहे प्लास्टिकचा वापर टाळा. एक पेड मॉ के लिये अभियान 2 संगोपनासहित झाडे लावा आवश्यक असेल तेथेच गाडी वापरा वायु प्रदूषण टाळा. ध्वनी नियंत्रित ठेवा प्रदूषण टाळा भारत माता की जय

Leave a Reply