भुसावळ – एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूल, शारदा नगर, भुसावळ येथे आज दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आणि संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
रक्षाबंधनाचा सण विद्यार्थ्यांमध्ये बंधु-भगिनीच्या नात्याचे महत्व अधोरेखित करणारा असून, यानिमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधत भावनिक आणि सांस्कृतिक नात्याची अनुभूती दिली. यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले.
रक्षाबंधनाच्या औचित्याने शाळेत “राखी बनविणे स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या कलागुणांचे सुंदर दर्शन घडवले.
या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी श्री. पी. व्ही. पाटील, ऑनरेरी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, सभासद श्री. विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोल्हे आणि पर्यवेक्षिका सौ. राखी बढे यांची उपस्थिती लाभली होती.
तद्नंतर शाळेत संस्कृत दिन देखील साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘सुरस सुबोधा’ हे संस्कृत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. या प्रसंगी संस्कृत शिक्षिका सौ. तनुजा चौधरी यांनी “संस्कृत भाषा : काळाची गरज” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सण आणि संस्कृती यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाती जपण्याचे आणि मातृभाषेचा सन्मान राखण्याचे मूल्य दृढ झाले.

Leave a Reply