ब्राह्मण संघ भुसावळतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे ॲड. अभिजीत अजय मेने यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम दि. 5 ऑगस्ट रोजी ब्राह्मण संघ सभागृहात पार पडला
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुषमा खानापूरकर होत्या. व्यासपीठावर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, उपाध्यक्ष गजानन जोशी, सचिव महेंद्र गोडबोले, सहसचिव सुनील पाठक, कोषाध्यक्ष आमोद टेंभुर्णीकर व अंतर्गत हिशेब तपासणीस भालचंद्र जोशी उपस्थित होते. समाज बांधव, भगिनी व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
ॲड. मेने यांचा डॉ. खानापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ॲड. मेने म्हणाले, “समाजाने दिलेली ही कौतुकाची थाप माझ्या खांद्यावर सकारात्मक प्रेरणा देणारी आहे. मी अजून जोमाने व मेहनतीने वकिली, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत राहील.”
ब्राह्मण संघाने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या समाजातील व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव केला.

Leave a Reply