रानातील महादेव मंदिर, श्रावण २०२५:श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र रानातील महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात रोज संध्याकाळी ७ वाजता नित्य आरती होते.
विशेष म्हणजे:- रविवारी दुपारी ५ वाजता बालसंस्कार वर्ग सोमवारी ७ वाजता श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण (११वा अध्याय) मंगळवारी सकाळी ५ वाजता सुंदरकांड पाठ आणि सायंकाळी ७.३० वाजता हनुमान चालीसा शनिवारी ७ वाजता सुंदरकांडाचे सामूहिक पठणयाशिवाय, प्रत्येक दशमी, एकादशी आणि द्वादशीला श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण केले जाते.
मंदिरात संस्कृती व सनातन धर्म प्रचार यासाठी विशेष उपक्रम जसे की श्रीरामकथा, श्रीमद भागवत कथा, आणि श्री शिव महापुराण कथा यांचे आयोजनही करण्यात येते.
गुरुवर्य श्री अतुल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम पार पडत असून, भक्तांनी या सेवांमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे
रानातील महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर संस्कार, साधना, आणि समाज प्रबोधनाचे केंद्र आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये आपली सदिच्छा, सेवा आणि उपस्थिती यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
ही एक अद्वितीय संधी आहे – भक्ती, संस्कार, व आध्यात्मिक उन्नती साधण्याची!आपण कुटुंबासह या कार्यक्रमांना उपस्थित राहून, अध्यात्मिक आनंद व पुण्य प्राप्त करावे, ही विनम्र विनंती.

Leave a Reply