भाजपाच्या संघटन पर्वाअंतर्गत भुसावळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शहर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. स्टार लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
सदरील कार्यकारणीत दोन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात सचिव व एक कोषाध्यक्ष अशी एकूण 18 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
या शहर कार्यकारणीत सामाजिक गणितांचा विचार करून समतोल राखण्याचा प्रयत्न करण्या सोबतच महिलांनाही संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
शहराध्यक्ष – संदीप पंडितराव सुरवाडे
सरचिटणीस– पवन बुंदेले, सागर चौधरी
उपाध्यक्ष– प्रीतमा गिरीश महाजन, वैशाली ललित मराठे, विशाल जंगले, मीना लोणारी, श्रेयस इंगळे, ॲड अभिजीत मेने, नितीन नाटकर
सचिव– प्रीती मुकेश पाटील, सुजित हेमराज भोळे, चेतन जैन, किरण सरोदे, रवींद्र खरात, प्रा सीमा धीरज पाटील, लखन रणधीर
कोषाध्यक्ष– सागर साळी
महिला मोर्चा अध्यक्षा -वैशाली सैतवाल
युवा मोर्चा अध्यक्ष –संकल्प वाणी
अनुसूचित जाती अध्यक्ष -संतोष ठोकळ
व्यापारी आघाडी अध्यक्ष – रिषभसिंह राजपूत
ज्येष्ठ कार्यकर्ता अध्यक्ष– शंकर शेळके
अल्पसंख्यांक अध्यक्ष -रेहमान शेख बाबू
शिक्षक आघाडी अध्यक्ष -तुषार चिंधळे
प्रसिद्धी प्रमुख -गोकुळ बाविस्कर
या कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत पक्ष संघटनेची मजबुती ही स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते, असे मत व्यक्त केले.

Leave a Reply