लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे एक ऑगस्ट रोजी अण्णासाहेब साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील व ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील,श्री अतुल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून अण्णासाहेब साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमे ला मार्ल्यापण करण्यात आले .

यानंतर विद्यार्थिनींनी दोन्ही नेत्यांवरआपली मनोगत सांगितले त्यानंतर शाळेतील शिक्षक वत्सला वानखेडे , पल्लवी पाटील,अतुल जाधव, सौ आशा पाटील यांनीही विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले .

शाळेचे मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी महत्त्व सांगितले .कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन सरोज कोष्टी,सौ योगिता पाटील यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *