भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात आज श्रावणी शुक्रवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले
त्यानंतर श्रावण शुक्रवार चे महत्व सांगून श्रावण महिना हा विविध सण उत्सव यांनी कसा भरलेला आहे त्यासोबतच हा महिना सामाजिक धार्मिक वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे या निमित्तानेशाळेत श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात येतो अशी माहिती दिली.
विद्यार्थिनीच्या मार्फत शुक्रवारची कहाणी सांगितली जाते यावेळी सकाळ सत्रात अवनी देवळा तर दुपार विभागात समीक्षा खनके हिने श्रावण शुक्रवारची कथा सांगितली .त्यानंतर गणपती व इतर देवींची आरती होऊन चणे फुटाण्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला .
सूत्रसंचालन सौ सरोज कोष्टी आणि सौ योगिता पाटील यांनी केले..
श्रावणी शुक्रावर निमित्त विद्यार्थिनी पारंपरिक वेषभूषा मध्ये विद्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply