वरणगाव – नेपाळमधील भीषण दुर्घटनेला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या दुर्घटनेतील मृतांच्या स्मृती प्रित्यर्थ गणपती हॉस्पिटल, वरणगाव येथे एक भावस्पर्शी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी, २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत रक्तदान शिबिर तसेच मोफत निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः दुर्बीणद्वारे गर्भपिशवी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, मुतखडा, प्रसूती, सीझर, फायमोसिस, अंगावरील गाठी इ. बाबत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.
हा उपक्रम वरणगाव शहरवासी, ऑर्डन्स फॅक्टरीतील सर्व कर्मचारी, विविध राजकीय व सामाजिक गट तसेच गणपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमाद्वारे समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत नेपाळ दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Leave a Reply