मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 29 मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रभाग क्रमांक 29 चे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीने आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम नगर, पंडित नगर येथील संपर्क कार्यालयात विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. परिसरातील नागरिकांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवर – भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,भाजप नेते महेश हिरे,मंडलाध्यक्ष राहुल गणरे,माजी नगरसेविका छाया देवा,महिला अध्यक्ष सोनाली ठाकरे,सोनाली राजे पवार,भूषण राणे,तुळशीराम भागवत,प्रकाश सोनवणे,राजेंद्र जडे,दिलीप देवा,शितल भामरे आदी उपस्थित होते.

त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.तसेच मुकेश शहाणे यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन कातकडे, राकेश कोष्टी, सोनू केदारे, प्रदीप चव्हाण, रोहित सूर्यवंशी, पंकज बोरसे, संदीप जाधव, सचिन कमांकर, आनंद आडले, चेतन सानप, कुणाल शहाणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरात समाधान आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *