22 जुलै 1947 ला त्याग, बलिदान, शांती व एकतेचे प्रतीक आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा अंगीकरण दिवस . विजयी विश्व तिरंगा प्यारा ,झेंडा उचा रहे हमारा. भूमाता की मिट्टी का तिलक लगाकर हमारा प्यारा तिरंगा ला वंदन करून संकल्प करूया निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे कुठलेही नुकसान न करण्याचा तसेच कार्बन डाय-ऑक्साइड मुक्तऑक्सिजन युक्त करण्याचा सद्यस्थितीत निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे कळत नकळत आपल्या हातून बरेचसे नुकसान झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहे त्यामुळे आपणाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार एक पेड माॅ के लिये अभियान दोन अभियाना अंतर्गत या पावसाळ्यात सर्व सजीवांना आवश्यक असलेले फळे फुले तसेच वृक्षाचे वटवृक्ष रूपांतर होणारे दीर्घकाळ टिकणारे किमान एक तरी वृक्ष लावून वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करूया.
डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान त्याचे संगोपन व संवर्धन म्हणजे पाण्याची व्यवस्था करून वृक्ष देवतेला पाणी देणे तसेच देखभाल करणे म्हणजेच रोज पाणी टाकून अभिषेक करून पूजा करणे. अशा रीतीने आपण वृक्ष देवतेसाठी घेतलेली काळजीचे प्रसादरुपी फळ आपणास कायमस्वरूपी आयुष्यभर मिळेल वृक्ष देवता चे रूपांतर व ते वृक्षात झाल्यावर स्वतः वृक्ष देवता उन्हात राहुन आपणास सावली देण्याचा काम करतातआपल्या येथील तापमानात घट होऊन ऑक्सिजन युक्त शुद्ध हवा व प्रसन्न वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल. चला तर मग आपण व आपल्यासहित घरातील प्रत्येक सदस्यांनी किमान एक तरी वृक्ष लावून वृक्ष देवतेची प्राणप्रतिष्ठा करून त्याचे संगोपन व संवर्धन करून जगवू या .

Leave a Reply