ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे सिद्धगुरू नित्यानंद स्वामी यांच्या 64 वा पुण्यतिथीनिमित्त निंभोरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही, पाटी,कंपास आदी साहित्य वाटप करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान हे दरवर्षी सिद्धगुरू नित्यानंद स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. सिद्धगुरु नित्यानंद स्वामी यांचा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बालभोजन.गणेशपूरी,मुंबई याठिकाणी स्वामीची समाधी मंदिर असून त्याठिकाणी दररोज बालभोजन उपक्रम सुरू असतो.तोच उपक्रम पुढे चालवत प्रतिष्ठान तर्फे भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील 40 विद्यार्थ्यांना पंचमुखी हनुमान कवच, वही, पाटी, कंपास आदी चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमांनंतर सर्वाना भाजी,पोळी, श्रीखंड आदींचे भोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका सुनीता जोशी, क्रांती ढाके, करुणा जोहरे,तुकाराम पाटील, वैशाली पाटील,डॉ. नितु पाटील,डॉ.रेणुका पाटील, राहुल माळी, राम शेटे, विवेक पाटील,चेतन झोपे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान सदस्य रिद्धी फेगडे,चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे,मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी,मनोज गोसावी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply