पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिनांक २० जुलै २०१५ रोजी राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठान भुसावळ संचलीत पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापनदिन लोणारी मंगल कार्यालय येथे मा. राजेंद्रभाऊ चौधरी, माजी सभापती पं.स भुसावल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा मा युवराजभाऊ लोणारी, माजी नगराध्यक्ष, नपा भुसावल, मा. सतीश भाऊ सपकाळे, मा-मुकेश पाटील, मा. राजुभाऊ आवटे, माजी नगरसेवक न.पा भुसावळ तसेच भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष मा. अँड. तुषार पाटील मा.टी.एस बावस्कर, मा आर.डी. बावस्कर, मा.पी.एस हरणकर व मा. बी.जी.चव्हाण हे व्यासपीठावर हजर होते

सर्व मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज तसेच महर्षी पतंजली यांच्या फोटोचे माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.वर्धापन दिन कार्यक्रमा करिता कुन्हा (पानाचे), खंडाळे, ता भुसावळ व शहरातील जयगुरुदेव जेष्ठ नागरिक संघ, जय मंगल जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आवर्जुन हजर होते.

मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य लाभो तसेच सध्या च्या परिस्थितीत कुटुबांशी जुळवून घेण्याकरिता स्वभावात फरक करून घेण्याच आवाहन केले. पुढील वर्षी पतंजली जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या सभागृहात संपन्न व्हावा याबाबत शुभेच्छा दिल्या जेष्ठ नागरिक संघास नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन मा.श्री युवराजभाऊ लोणारी, मा-श्री. सतिशभाऊ सपकाळे, मा-भी राजुभाऊ आवटे यानी दिले. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या सन्माननीय सदस्यांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर आशिष राठी यांनी नूतन कार्य करण्याचे स्वागत केले.

श्री एस एम अकोले सचिव यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच श्री ए बी श्रावगी कोषाध्यक्ष यांनी आर्थिक जमाखर्च वाचून दाखवला. नवीन कार्यकारिणी वाचून दाखवली. सूत्रसंचालन श्री के यु पाटील सर मुख्याध्यापक चिखली बुद्रुक तालुका यावल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बी एस पाटील यांनी केले

श्री. आर. एस वसतकर (सेवानिवृत्र API) यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्री एस एम अकोले यांनी आगामी काळात करावयाच्या नियोजन बाबत सभेत माहिती दिली. सभेस स्त्री पुरुष मिळून ९०ते १०० जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

वंदेमातरम राष्ट्रीय गीत वाजवून सभेची सांगता झाली. सभेनंतर सुरुची भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *