भुसावळमध्ये भाजपा स्थापना दिन जल्लोषात; 1.50 कोटी सभासदांचा टप्पा पार, भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन भुसावळ शहरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. याच वेळी पक्षाने 1 कोटी 50 लाख सभासद संख्या गाठल्याची घोषणा करत सर्व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विशेषतः भुसावळकरांनी या सभासद नोंदणी मोहीमेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी भाजपा परिवारात सहभागी होत पक्षाच्या बळकटीकरणात मोलाचा वाटा उचलला.
मंत्री संजय सावकारे यांनी भाषणातून पक्षाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, भुसावळच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले. “भुसावळ हे पक्षासाठी नेहमीच कणा ठरले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

जाहिरात 👇



Leave a Reply